Amla : लांब आणि दाट केसांसाठी करा नैसर्गिक उपाय, आवळ्यांची युक्ती येईल कामी

Last Updated:

आवळ्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे याचा उपयोग तुम्ही केसांसाठी करू शकता. यामुळे केस पूर्वीपेक्षा लांब आणि दाट होतील. केस लांब, दाट आणि काळेभोर होण्यासाठी केसांवर अनेक प्रयोग केले जातात. कधी हेअर मास्क, कधी तेल असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. केस गळत असतील तर त्यावर हा नैसर्गिक उपाय करून पहा.

News18
News18
मुंबई: हिवाळ्यात आवळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. आवळ्यातल्या औषधी गुणधर्मांमुळे याचा उपयोग तुम्ही केसांसाठी करू शकता. यामुळे केस पूर्वीपेक्षा लांब आणि दाट होतील. केस लांब, दाट आणि काळेभोर होण्यासाठी केसांवर अनेक प्रयोग केले जातात. कधी हेअर मास्क, कधी तेल असे सगळे पर्याय उपलब्ध आहेत. केस गळत असतील तर त्यावर हा नैसर्गिक उपाय करून पहा.
केसांसाठी आवळ्याचे फायदे
आवळा केस आणि त्वचेसाठी सुपरफूड आहे. आवळ्याचा उपयोग केवळ फळ म्हणून किंवा लोणचं, भाजीसाठीही होतो. आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं. केसांच्या योग्य आणि चांगल्या वाढीसाठी हे जीवनसत्त्व उपयुक्त ठरू शकतं.
आवळ्याचा वापर कशाप्रकारे करावा
advertisement
आवळ्याचा योग्य वापर केला तर केसांसाठी खूप फायदेशीर ठरू शकतो. लांब आणि दाट केसांसाठी आवळा ज्यूस उपयुक्त ठरेल. यासाठी दररोज फक्त एक किंवा दोन आवळे पुरेसे आहेत. आवळे बारीक चिरून घ्या. त्यात कढीपत्ता आणि थोडं आलं घाला. या सर्व गोष्टी मिक्सरमध्ये एकत्र करून बारीक करा. आणि, रस तयार करा. हा रस रोज प्यायल्यानं केसांच्या वाढीवर परिणाम होतो. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही चिमूटभर मीठही मिक्स करू शकता.
advertisement
तुमच्याकडे वेळ कमी असेल किंवा जर तुम्हाला दररोज हा रस बनवणं शक्य होणार नसेल तर तुम्ही ते साठवूनही ठेवू शकता. तुम्ही तयार केलेला रस साठवण्यासाठी, बर्फाच्या ट्रेमध्ये ठेवा. तुम्हाला ज्यूस प्यायचा असेल तेव्हा कोमट पाण्यात हे आवळा बर्फाचे तुकडे टाका. रस वितळताच प्या.
advertisement
केसांसोबतच त्वचेसाठीही आवळा फायदेशीर
केस गळण्यासोबतच त्वचेवर मुरुमांचा त्रास होत असेल तर आवळ्याचा रस उपयुक्त आहे. आवळ्याचा रस नियमितपणे प्यायल्यानं त्वचेवरील डाग कमी होतात आणि त्वचा चमकदारही होईल.
आवळा ज्यूस पिण्याचे आरोग्य फायदे
आवळा ज्यूस प्यायल्यानं तुमच्या त्वचेला आणि केसांनाच नाही तर तुमच्या संपूर्ण आरोग्यालाही फायदा होईल. आवळा ज्यूसच्या मदतीनं शरीरातील लाल रक्तपेशी वाढतात. हाडं मजबूत होतात आणि हृदयाचं आरोग्यही चांगलं राहतं.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Amla : लांब आणि दाट केसांसाठी करा नैसर्गिक उपाय, आवळ्यांची युक्ती येईल कामी
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement