Eye Exercises : थकलेल्या डोळ्यांना द्या आराम, डोळे निरोगी ठेवण्यासाठी करा हे व्यायाम
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डोळ्यांच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते तुमच्या डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतं. काही छोटे उपाय केले तर तुम्ही डोळ्यांचा थकवा कमी करू शकता आणि तुमचे डोळे निरोगी ठेवू शकता.
मुंबई : शरीर थकल्यावर आरामाची गरज असते तसंच डोळ्यांनाही थकवा येतो. डोळ्यांच्या थकव्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते डोळ्यांसाठी हानिकारक असू शकतं. येथे सांगितलेल्या उपायांचा अवलंब करून तुम्ही डोळ्यांचा थकवा कमी करू शकता आणि तुमचे डोळे निरोगी ठेवू शकता.
तासन्तास स्क्रीनसमोर बसून काम करण्यामुळे आणि मोबाईलमुळे डोळ्यांना थकवा येणं ही जाणवते आहे. कॉम्प्युटरवर काम करणं, स्मार्टफोन, टिव्ही पाहणं यामुळे डोळ्यांना थकवा येतो. त्यामुळे डोळ्यांमध्ये जळजळ, सूज, दृष्टी अंधुक होणं किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या उद्भवू शकतात.
डोळ्यांचा थकवा दूर करण्यासाठी या 4 पद्धती वापरून पहा
advertisement
1. 20-20-20 नियम वापरुन पाहा
डोळ्यांचा थकवा कमी करण्याचा सर्वात प्रभावी मार्ग म्हणजे 20-20-20 नियमांचं पालन. दर 20 मिनिटांनी स्क्रीनपासून 20 फूट दूर असलेल्या वस्तूकडे 20 सेकंद पहा. यामुळे डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो आणि डोळ्यांचा थकवा कमी होतो.
2. डोळ्यांना मसाज करा
डोळ्याभोवती हलक्या हातांनी मसाज केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं आणि डोळ्यांना आराम मिळतो. यासाठी, डोळ्याभोवती बोटं हलक्या दाबानं गोलाकार फिरवा. या मसाजमुळे थकलेल्या डोळ्यांच्या स्नायूंना आराम मिळतो.
advertisement
3. चांगली झोप घ्या
डोळ्यांसाठी झोप खूप महत्त्वाची आहे. पुरेशी आणि गाढ झोप घेतली तर डोळ्यांना पूर्ण विश्रांती मिळते. प्रौढांना 7-8 तासांची झोप आवश्यक असते. झोपण्यापूर्वी मोबाईल फोन किंवा इतर स्क्रीनपासून दूर राहा, जेणेकरून तुमच्या डोळ्यांना पूर्ण विश्रांती मिळेल आणि ताजंतवानं वाटेल.
advertisement
4. थंड पाण्यानं डोळे धुवा
डोळ्यांना थकवा जाणवत असेल तर थंड पाण्यानं डोळे धुणं हा एक सोपा पण प्रभावी उपाय आहे. थंड पाण्यानं डोळ्यांची सूज कमी होते आणि डोळ्यांना ताजेपणा जाणवतो. तुम्ही थंड पाण्यात कापड बुडवून काही वेळ डोळ्यांवर ठेवू शकता, यामुळे डोळ्यांना थंडावा आणि आराम मिळेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 25, 2025 7:28 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Eye Exercises : थकलेल्या डोळ्यांना द्या आराम, डोळे निरोगी ठेवण्यासाठी करा हे व्यायाम


