या बियांमध्ये लोह, पोटॅशियम, तांबं आणि मॅग्नेशियम हे घटक देखील आढळतात. भोपळ्याच्या बिया सतत 30 दिवस खाल्ल्यानं शरीरावर कोणते परिणाम होतात आणि आरोग्यासाठी काय फायदे होतात हे जाणून घ्या.
Hair Fall : केस गळण्याचं घेऊ नका टेन्शन, या तीन गोष्टी करा, केस गळणं होईल कमी
- हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं - भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असतं ज्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या कमी होते. यामुळे हृदयाच्या आरोग्याला फायदा होतो. त्याचबरोबर अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असल्यानं भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं रक्तप्रवाह सुधारतो, रक्तवाहिन्यांना फायदा होतो आणि हृदयाच्या समस्या कमी होतात.
- चांगली झोप - अनेकांना झोप नीट लागत नाही. अनेकदा रात्री जाग येते आणि पुन्हा नीट झोपायला त्रास होतो. भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं झोपेशी संबंधित समस्या दूर होतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं शरीराला झिंक, सेलेनियम आणि तांबं हे घटक मिळतात, ज्यामुळे झोपेची गुणवत्ता सुधारण्यासाठी उपयोग होतो.
- सांधेदुखी कमी होते - भोपळ्याच्या बियांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात. या बियांचं सेवन केल्यानं शरीराला अँटी-ऑक्सिडंट्सही चांगल्या प्रमाणात मिळतात. भोपळ्याच्या बिया खाल्ल्यानं सांधेदुखी बरी होऊ लागते. शरीराच्या वेगवेगळ्या भागात होत असलेली जळजळ यामुळे कमी होते, वेदनांपासूनही आराम मिळतो.
advertisement
 advertisement    
Health Tips: पोट स्वच्छ राहण्यासाठी हे उपाय करून बघा, तब्येत राहिल उत्तम
 advertisement    
- रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते - भोपळ्याच्या बियांमुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. भोपळ्याच्या बिया योग्य प्रकारे खाल्ल्या तर अनेक रोगांचा धोका दूर होतो. भोपळ्याच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई आणि झिंक असतं, यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत होते. या बियांमधून शरीराला अँटीबॅक्टेरियल गुणधर्म, अँटीफंगल गुणधर्म आणि अँटीव्हायरल गुणधर्म देखील मिळतात ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते.
- हाडं मजबूत होतात - खनिजं भरपूर असल्यानं भोपळ्याच्या बियांमुळे हाडं मजबूत होतात. या बिया खाल्ल्यानं हाडांना मॅग्नेशियम मिळतं. हाडं दुखत असतील किंवा हाडं कमकुवत वाटत असतील त्यांनी विशेषतः भोपळ्याच्या बियांचे सेवन करावं.
- भोपळ्याच्या बिया स्वच्छ करून भाजून खाऊ शकता. या बिया स्मूदी, सॅलड्स आणि सूपमध्ये घालता येतात. भोपळ्याच्या भाजलेल्या बिया नुसत्याही चांगल्या लागतात. या बिया बारीक करून, भोपळ्याचं लोणी बनवता येतं, ब्रेडवर लावून खाण्यासाठी हे बटर चवीला स्वादिष्ट लागतं.
 advertisement    
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 15, 2025 5:50 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pumpkin Seeds: रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी खा भोपळ्याच्या बिया..हृदयरोगापासून संधीवात दूर करण्यासाठी उपयुक्त
