advertisement

Hair Fall : केस गळण्याचं घेऊ नका टेन्शन, या तीन गोष्टी करा, केस गळणं होईल कमी

Last Updated:

अनेकदा जीवनशैलीतले बदल, अन्नातील पोषक तत्वांचा अभाव, व्यस्त जीवन, ताण या सगळ्या कारणांमुळे बहुतेकदा केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यावर आहार, टाळूचं योग्य पोषण होणं आणि व्यसनं टाळणं हे उपाय महत्त्वाचे आहेत. 

News18
News18
मुंबई : तुमचे केस गळत असतील तर आजपासूनच या 3 गोष्टी करायला सुरुवात करा, कारण यामुळे केस गळणं कमी होईल. त्वचातज्ज्ञांनी दिलेल्या सोप्या 3 टिप्स वापरल्या तर, केस गळणं आणि केस गळण्याचं प्रमाण कमी करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात.
अनेकदा जीवनशैलीतले बदल, अन्नातील पोषक तत्वांचा अभाव, व्यस्त जीवन, ताण या सगळ्या कारणांमुळे बहुतेकदा केस गळण्याच्या समस्येला सामोरं जावं लागतं. यावर आहार, टाळूचं योग्य पोषण होणं आणि व्यसनं टाळणं हे उपाय महत्त्वाचे आहेत. 
advertisement
सल्ला क्रमांक 1- आहार
केस गळतीवर सर्वात पहिला उपाय म्हणजे - योग्य आहार. तज्ज्ञही सर्वात प्रथम आहाराकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. केस गळण्याची समस्या येत असेल, तर सर्वप्रथम तुमच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण वाढवा. दररोज शरीराच्या वजनाच्या प्रति किलोग्राम 1 ग्रॅम दरानं प्रथिनं घ्या. केस फक्त प्रोटीननं बनलेले असतात, त्यामुळे केस गळण्याचं प्रमुख कारण प्रोटीनची कमतरता असू शकते. म्हणून, आपल्या प्रथिनांच्या सेवनाकडे लक्ष द्या, असा सल्ला त्वचा तज्ज्ञ अंकुर सरीन यांनी दिला आहे.
advertisement
सल्ला क्रमांक 2- टाळूचं पोषण
केस गळणं टाळण्यासाठी, टाळूचं पोषण योग्य रीतीनं होणं गरजेचं आहे. यासाठी तुम्ही तुमच्या केसांची निगा राखण्यासाठी पेप्टाइड आधारित सीरमचा समावेश करू शकता. यामुळे केसांच्या वाढीला उत्तेजन मिळतं, यामुळे केस गळणं कमी होतं आणि टाळूचं आरोग्य सुधारतं. यासाठी देखील नियासिनमाइड आणि झिंक पेप्टाइड सिरम  अधिक फायदेशीर ठरू शकतं.
advertisement
नियासीनामाइडमुळे केसांच्या कुपांचं पोषण होतं आणि रक्ताभिसरण सुधारतं. ज्यामुळे केसांच्या वाढीला प्रोत्साहन मिळतं आणि केस गळण्याची समस्या कमी होते. दुसरीकडे, झिंक पेप्टाइड्स, प्रथिनं तयार करण्यात मदत करतात, जे केसांसाठी देखील अत्यंत महत्वाचे आहे.
advertisement
सल्ला क्रमांक 3- धूम्रपान
या सर्वांशिवाय धुम्रपान पूर्णपणे वर्ज्य करण्याचा सल्ला डॉ सरीन यांनी दिला आहे. धुम्रपान केल्यानं केसांना रक्तपुरवठा कमी होतो, त्यामुळे केस गळण्याची समस्या वाढते. अशा परिस्थितीत केसांची काळजी घेण्यासोबतच आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी धूम्रपान टाळा असंही ते आवर्जून सांगतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Fall : केस गळण्याचं घेऊ नका टेन्शन, या तीन गोष्टी करा, केस गळणं होईल कमी
Next Article
advertisement
Shiv Sena UBT On Raj Thackeray : राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजकीय...''
राज ठाकरेंकडून लवचिक धोरणाचे संकेत, ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया, ''ते एका राजक
  • राज ठाकरे यांनी राजकीय लवचिकतेचे संकेत दिल्यानंतर मुंबईसह राज्यात एकच राजकीय चर्

  • राज ठाकरे यांनी लिहिलेल्या पोस्टवर शिवसेना ठाकरे गटाने आपली प्रतिक्रिया दिली

  • शिवसेना ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी त्यावर भाष्य केले आहे.

View All
advertisement