Hair Care : केसात अडकलेला रंग काढण्यासाठी मास्क, कोरफड, लिंबू, अंड्याचा होईल उपयोग
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तुमच्या केसांतही होळीचा रंग अडकला असेल तर घरगुती उपायांनी तुम्ही रंग काढू शकता, यामुळे तुमचे केस पूर्णपणे स्वच्छ होतील.
मुंबई : होळी, धुलिवंदनाचा आनंद घेतल्यानंतर आता तुम्ही रिलॅक्स झाला असाल पण केसांमध्ये, टाळूवर अडकलेला रंग अजून निघाला नसेल तर ही माहिती तुमच्यासाठी. तुमच्या केसांतही होळीचा रंग अडकला असेल तर घरगुती उपायांनी तुम्ही रंग काढू शकता, यामुळे तुमचे केस पूर्णपणे स्वच्छ होतील.
केसांना इजा न करता रंग काढणं अनेकदा कठीण काम असू शकतं. रंगांमध्ये आढळणारी रसायनं केसांना इजा पोहचवतात. त्यामुळे केसांची योग्य काळजी घेणं आवश्यक आहे.
केसांमधून रासायनिक रंग नीट निघाला नाही तर केस आणि टाळू दोन्ही खराब होऊ शकतात. रासायनिक रंगांमुळे केस कोरडे आणि निर्जीव दिसू लागतात.
advertisement
हे रंग पूर्णपणे काढण्यासाठी तुम्ही काही नैसर्गिक आणि साधे घरगुती उपाय वापरु शकता. खोबरेल तेल लावणं किंवा केस धुण्यापूर्वी अंडी आणि कोरफड जेलचा मास्क लावणं. यामुळे रंग निघायला मदत होते आणि टाळूला थंडावा मिळतो.
लेमन हेअर मास्क
advertisement
रंग काढून टाकण्यासाठी सर्वात सोपा परंतु अत्यंत प्रभावी हेअर मास्क म्हणजे लेमन हेअर मास्क. दोन लिंबांचा रस घ्या आणि थेट टाळूवर लावा. 20 मिनिटं यानं पूर्ण टाळूला मसाज करा, नंतर शॅम्पू आणि कंडिशनरनं धुवा.
अंड्यातील पिवळ बलक आणि दही मास्क
अंड्यातील पिवळ बलक आणि दह्याचा मास्क रंग काढून टाकण्याचा आणखी एक सोपा मार्ग आहे. दोन अंड्यांचा पिवळ बलक घ्या आणि दह्यामध्ये मिसळा. बलक किती घ्यायचा हे तुमच्या केसांच्या लांबीवर अवलंबून आहे. केसांच्या मुळांपासून ते टोकापर्यंत मिश्रण लावा, 40 मिनिटं मिश्रण तसंच राहू द्या. मास्क पूर्णपणे कोरडा होऊ द्या आणि नंतर साध्या पाण्यानं धुवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 14, 2025 6:38 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केसात अडकलेला रंग काढण्यासाठी मास्क, कोरफड, लिंबू, अंड्याचा होईल उपयोग