advertisement

Mosquitoes : डासांना पळवण्यासाठी कांदा, लसूण, लवंगांचा करा वापर, डास होतील गायब

Last Updated:

उन्हाळा सुरु झाला की डासांचा त्रास वाढतो. कानात गुणगुणाऱ्या आणि चावणाऱ्या डासांचा त्रास सगळ्यांनाच होतो. या डासांनी तुम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली असेल तर काही घरगुती उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल.

News18
News18
मुंबई : उन्हाळा सुरु झाला की डासांचा त्रास वाढतो. कानात गुणगुणाऱ्या आणि चावणाऱ्या डासांचा त्रास सगळ्यांनाच होतो. या डासांनी तुम्हाला त्रास देण्यास सुरुवात केली असेल तर काही घरगुती उपायांची तुम्हाला नक्की मदत होईल.
लवंगा वापरल्यानं तुमची यापासून सुटका होऊ शकेल. उन्हाळा सुरू झालाय, डासांची संख्याही वाढू लागली आहे. या डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करुन बघू शकता. डासांमुळे रात्री झोपणं कठीण होऊन जातं. त्यामुळे लवंग, कांदा आणि कापूर वापरुन तुम्ही उपाय करु शकता.
लवंग, कांदा आणि कापूर
हा घरगुती उपाय करण्यासाठी 4 ते 5 लवंगा, एक कांदा, कापूर आणि मोहरीचं तेल घ्या. सर्व प्रथम, कांदा घ्या, त्याचा वरचा भाग कापून घ्या आणि त्यावर चाकूनं एक छिद्र करा ज्यामध्ये तेल भरता येईल. त्यात मोहरीचं तेल, कापूर आणि लवंगा घाला. आता कापसाची वात तयार करुन ती या तेलात बुडवून पेटवून ठेवा. या घरगुती उपायानं डास दूर होतील. या दिव्यातून निघणारा धूर डासांना दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो.
advertisement
लसूण
डासांपासून दूर राहण्यासाठीही लसणाचा वापर केला जाऊ शकतो. ही रेसिपी वापरण्यासाठी, लसूण ठेचून एक कप पाण्यात घाला. यासाठी तुम्ही 10 ते 12 लसूण पाकळ्या घेऊ शकता. हे द्रावण स्प्रे बाटलीत भरुन डासांवर शिंपडा. लसणाचा वास असह्य झाल्यानं डास दूर होतील.
advertisement
लिंबू आणि लवंग
डासांपासून मुक्त ठेवण्यासाठी अर्ध लिंबू घ्या आणि त्यात 7 ते 8 लवंगा खोचून खोलीत ठेवा. लिंबू आणि लवंगाचा वास डासांना खोलीत येण्यापासून रोखेल. लवंगातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. त्यामुळे लिंबू खोलीत ठेवता येईल.
advertisement
  • डास चावलेला भाग दुखत होत असेल आणि या खुणा मुरुमांसारख्या दिसत असतील तर त्यावर मध लावू शकता. मधामधले गुणधर्मामुळे जखम वेगानं बरी होते.
  • डास चावलेल्या भागाला थोडी जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावता येईल.
  • नारळाच्या तेलामुळे डास चावलेल्या भागावर कोणताही त्रास होत नाही आणि पुरळ कमी होतं.
  • डास चावल्यामुळे त्वचा सुजून लाल झाली असेल त्यावर कोरफड लावू शकता. कोरफड गरामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. त्यामुळे सुजलेल्या त्वचेची सूजही कमी होते.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Mosquitoes : डासांना पळवण्यासाठी कांदा, लसूण, लवंगांचा करा वापर, डास होतील गायब
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement