'An Apple a day keeps doctor away' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. त्याचप्रमाणे, रोज एक डाळिंब खाल्ल्यानं आरोग्याला अनेक लाभ होतात. तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर रोज एक डाळिंब खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
Hair Care : केस गळती रोखण्यासाठी पारंपरिक औषध, खोबरेल तेलाला पर्याय नाही
advertisement
- डाळिंबात व्हिटॅमिन सी देखील आढळतं, ज्यामुळे शरीरात लोहाचं शोषण वाढण्यास मदत होते.
- शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
- हृदयाच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.
- डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
- रोज एक डाळिंब खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
advertisement
Weight Loss Tips : लठ्ठपणा कमी करण्यासाठी हे बदल करा, प्रतिकारशक्तीही वाढेल
- डाळिंबात आढळणारे घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते.
- रोज एक डाळिंब खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित राहतो. बीपी म्हणजेच रक्तदाब सतत वाढत असेल तर रोज एका डाळिंबाचा आहारात समावेश करा.
- डाळिंबातल्या विविध गुणधर्मांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 03, 2025 5:54 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त