Hair Care : केस गळती रोखण्यासाठी पारंपरिक औषध, खोबरेल तेलाला पर्याय नाही
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण तुमच्या आहारात काही बदल केलेत तर व्हिटॅमिन सी, ई आणि लोहयुक्त पदार्थ वाढवू शकता. हे सर्व पोषक घटक तुमच्या केसांची चमक, ताकद वाढवतील आणि यामुळे केस वाढतील.
मुंबई : केस कोरडे होणं, केस गळणं या समस्यांवर वर्षानुवर्षं घरोघरी केला जाणारा उपाय म्हणजे खोबरेल तेलानं मालिश. पण यामध्ये आणखी काही गोष्टी मिसळल्या तर केसांचं पोषणही होईल, आणि गळतीही थांबेल.
केस गळण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पण तुमच्या आहारात काही बदल केलेत तर व्हिटॅमिन सी, ई आणि लोहयुक्त पदार्थ वाढवू शकता. हे सर्व पोषक घटक तुमच्या केसांची चमक, ताकद वाढवतील आणि यामुळे केस वाढतील. याशिवाय कढीपत्ता, मेथी, तुरटी, शिकाकाई, जास्वंदाची फुलं, कडुनिंबाची पानं, दालचिनी पावडर आणि व्हिटॅमिन ई तेल मिसळून खोबरेल तेल लावू शकता.
advertisement
हे सर्व घटक तुमचे केस गळणं आटोक्यात ठेवण्यास पूर्णपणे मदत करतात. याशिवाय, टाळूमध्ये रक्ताभिसरण सुधारण्यासाठी देखील हे घटक उपयुक्त आहेत. याशिवाय, यामुळे तुमच्या केसांना भरपूर पोषण आणि आर्द्रता मिळते. हे सर्व घटक खोबरेल तेलात मिसळून लावल्यानं कोंड्याची समस्याही दूर होते. त्यामुळे साधं खोबरेल तेल लावण्याऐवजी यापैकी एखादी गोष्ट मिसळून लावल्यास केसांशी संबंधित समस्या दूर होऊ शकतात.
advertisement
या गोष्टीही लक्षात ठेवा
व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळेही केस गळतात. ज्यामध्ये व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ए, बी कॉम्प्लेक्स, व्हिटॅमिन बी 12, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी 9, ई, व्हिटॅमिन 7 समाविष्ट आहे.
केस गळणं थांबवण्यासाठी काय खावं ?
रताळं - यामध्ये व्हिटॅमिन ए असतं, ज्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते.
advertisement
तुम्ही राजमा खाऊ शकता, त्यात फायबर, प्रोटीन आणि फोलेट हे घटक असतात.
आपल्या आहारात दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करा.
ओट्स खा, त्यात फायबर, लोह, झिंक, ओमेगा फॅटी ॲसिड असतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 7:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Care : केस गळती रोखण्यासाठी पारंपरिक औषध, खोबरेल तेलाला पर्याय नाही