मुंबई : स्वयंपाकाची चव वाढवण्यासाठी फोडणी फार महत्त्वाची असते. फोडणीतल्या प्रत्येक पदार्थाची चव जेवणात उतरते. त्यातल्या लसणालाही एक विशिष्ट चव असते. शिवाय लसूण विविध औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असतो. यातून शरिराला भरपूर पोषक तत्त्व मिळतात आणि आरोग्य निरोगी राहतं.
अनेकजणांना लसणाचा उग्र वास आवडत नाही, त्यामुळे ते लसूण खाणं टाळतात. परंतु थोडा का होईना पण दररोज जेवणातून लसूण पोटात जाणं फायदेशीर असतं. आयुर्वेदात लसणाला औषधी मानलं जातं. नियमित लसणाचं सेवन केल्यास रक्तातलं साखरेचं प्रमाण कमी होण्यास मदत मिळते. लसणात व्हिटॅमिन बी6 आणि सी जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असतं. व्हिटॅमिन बी6 अन्नपचनासाठी उपयुक्त ठरतं. तर रक्तातली साखरेची पातळी नियंत्रित राहण्यासाठी व्हिटॅमिन सीची आवश्यकता असते.
advertisement
हेही वाचा : साखर खाणं आजच थांबवा! तुमच्या ध्यानीमनी नसेल, एवढं प्रचंड होतंय शरिराचं नुकसान
लसूण कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराइड्स आणि रक्तातली लिपिड लेव्हल कमी करून हृदयाचं आरोग्य सुधारतो. प्रसिद्ध न्यूट्रिशन एक्सपर्ट निखिल वत्स सांगतात की, लसूण सकाळी उपाशीपोटी खाल्ल्यानं त्यातले पोषक तत्त्व व्यवस्थित मिळतात.
लसूण खाण्याचे फायदे:
• रक्तदाब राहतो नियंत्रणात.
• वजन कमी होण्यास मिळते मदत.
• हृदय राहतं निरोगी.
• सर्दी-खोकल्यावर मिळतो आराम.
• पचनक्रिया सुधारते.
• श्वासासंबंधी त्रासावर उपयुक्त.
• कोलेस्ट्रॉल करतं कमी.
• डायबिटीजचा धोका होतो कमी.
• हिमोग्लोबिन वाढतं.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.