दिवसाच्या सुरुवातीपासून झोपेपर्यंत आपण दिवसभरात करत असलेल्या गोष्टींचा कळत - नकळत परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो. आपल्या सवयींवर आपलं आरोग्य अवलंबून असतं. खाण्या - पिण्याच्या वेळा, सवयींमधे आपण अनेकदा नकळत काही चुका करतो, ज्यामुळे हळूहळू आपल्या शरीराचं नुकसान होऊ शकतं.
बऱ्याचदा आपण कमी पाणी पितो, पुरेशी झोप घेत नाही किंवा व्यायामाकडे दुर्लक्ष करतो, या सगळ्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. या छोट्या सवयींमुळे चयापचय, रोगप्रतिकारक शक्ती आणि ऊर्जा पातळीवर परिणाम होताे. या तीन चुका वाचायला सोप्या वाटत असल्या तरी यामुळे आरोग्य कमकुवत होऊ शकतं. पण या सवयी सुधारल्या तर अधिक निरोगी आणि उत्साही वाटू शकतं.
advertisement
या चुका टाळा -
1. पुरेसं पाणी न पिणं
आरोग्यासाठी पाणी खूप महत्वाचं आहे, पण बरेच लोक दिवसभर पुरेसे पाणी पीत नाहीत. डिहायड्रेशनमुळे शरीरात थकवा, डोकेदुखी, बद्धकोष्ठता आणि कोरडी त्वचा यासारख्या अनेक समस्या उद्भवू शकतात.
Fever : वारंवार ताप येत असेल तर दुर्लक्ष करु नका, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण
हे नक्की करा -
दररोज 8-10 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. सकाळी उठल्यानंतर एक ग्लास कोमट पाणी प्या. त्यानंतरही पाणी पिण्याचं विसरत असाल तर मोबाईलमध्ये पाणी पिण्यासाठीचे रिमाइंडर सेट करता येतील. ज्यामुळे पाणी पिण्याची आठवण होईल आणि पाणी प्यायलं जाईल.
2. झोपेचा अभाव
झोप चांगली झाल्यानं शरीरावर अनेक वाईट परिणाम होऊ शकतात. यामुळे स्मरणशक्ती कमी होणं, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणं, लठ्ठपणा वाढणं आणि ताण वाढणं असे परिणाम दिसतात.
हे नक्की करा -
यासाठी, दररोज 7-8 तास गाढ झोप घेण्याचा प्रयत्न करा. झोपण्यापूर्वी मोबाईल स्क्रीन टाळा, जेणेकरून झोपेची गुणवत्ता चांगली राहील. झोपण्याची आणि उठण्याची नियमित वेळ निश्चित करा. यामुळे पुढचा पूर्ण दिवस चांगला जाईल.
Hair Care : केसांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, संतुलित आहारानं टिकेल केसांचं आरोग्य
3. व्यायामाचा अभाव
रोजच्या दिनक्रमात अनेकदा व्यायामाकडे दुर्लक्ष होतं, यामुळे शरीर कमकुवत, अशक्त वाटतं. अंगात आळस येतो. नियमित व्यायाम न केल्यानं रक्तदाब, मधुमेह आणि हृदयरोगाचा धोका वाढतो.
हे नक्की करा -
दररोज किमान तीस मिनिटं शारीरिक हालचाल करा. व्यायाम करा, योगासनं करा किंवा चालायला जा. ऑफिसमध्ये काम करताना, अधूनमधून उठून चालत जा.
या चुका दुरुस्त केल्या तर त्याचा आरोग्यावर सकारात्मक परिणाम होईल. योग्य सवयी अंगीकारल्या की तुम्ही उत्साही, निरोगी आणि आनंदी जीवन जगू शकता. त्याची सुरुवात आजपासूनच करा.
