Fever : वारंवार ताप येत असेल तर दुर्लक्ष करु नका, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
वारंवार ताप येत असेल, तर ती किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी हा साधा विषाणू संसर्ग नसून तो एखाद्या शरीराअंतर्गत आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतो.
मुंबई : वातावरण बदलाचा काहींच्या प्रकृतीवर परिणाम होतो. काहींना सर्दी, खोकला, घसा दुखणं अशा समस्या जाणवू शकतो. पण या व्यतिरिक्त वारंवार ताप येत असेल, तर ती किरकोळ समस्या समजून त्याकडे दुर्लक्ष करू नका. कधीकधी हा साधा विषाणू संसर्ग नसून तो एखाद्या शरीराअंतर्गत आरोग्य समस्येचं लक्षण असू शकतो. सहसा, शरीराची रोगप्रतिकारक शक्ती संसर्गाशी लढत असताना ताप येतो. पण जर काही दिवसांनीही ताप येत असेल तर त्याकडे लक्ष देणं महत्त्वाचं ठरतं. वारंवार येणाऱ्या तापामागे अनेक गंभीर आजार असू शकतात.
1. टायफॉइड
टायफॉइड हा एक जिवाणूमुळे होणार संसर्ग आहे. दूषित पाणी किंवा अन्नबाधेनंही हा संसर्ग पसरतो. त्यामुळे सतत ताप येतो आणि रुग्णाला पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखी देखील होऊ शकते.
2. ब्रुसेलोसिस
हा एक जिवाणू संसर्ग आहे जो संक्रमित प्राण्यांच्या उत्पादनांच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे वारंवार ताप येतो. घाम येणं, स्नायू दुखणं आणि अशक्तपणा देखील असू शकतो.
advertisement
3. यूटीआय - UTI - Urinary track infection -
यूटीआय म्हणजे मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवी करताना जळजळ होते आणि वारंवार लघवी करावी लागते. यामध्ये ताप देखील येऊ शकतो, संसर्ग मूत्राशयातून मूत्रपिंडात पसरतो तेव्हा ताप येऊ शकतो.
4. ल्युपस
advertisement
ल्युपस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते.
यामुळे सौम्य ताप वारंवार येऊ शकतो. यासोबतच सांधेदुखी, थकवा आणि त्वचेवर पुरळ उठणं अशी लक्षणं देखील दिसतात.
5. मलेरिया
मलेरिया हा डास चावल्यानं होणारा आजार आहे. यामध्ये थंडी वाजून ताप येतो आणि त्यानंतर तीव्र ताप येतो जो तीन दिवसांच्या अंतरानं परत येतो. यासोबतच घाम येणं, डोकेदुखी आणि थकवा देखील जाणवतो.
advertisement
6. डेंग्यू
डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांमुळे पसरतो. त्यामुळे जास्त ताप येतो आणि डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखतात. ताप कमी झाल्यानंतरही तो परत येऊ शकतो.
7. टीबी (क्षयरोग)
टीबी हा हळूहळू पसरणारा जिवाणू संसर्ग आहे, यामुळे फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे विशेषतः संध्याकाळी सौम्य ताप येतो. याशिवाय, रात्री घाम येणं, वजन कमी होणं आणि दीर्घकाळ खोकला ही लक्षणं दिसून येतात.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
June 03, 2025 1:01 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fever : वारंवार ताप येत असेल तर दुर्लक्ष करु नका, गंभीर समस्येचं असू शकतं लक्षण









