advertisement

देवीचं दर्शन घेऊन परत जात होते, टायर फुटलं अन् कार चहाच्या स्टॉलमध्ये शिरली, 2 जणांचा जागीच मृत्यू

Last Updated:

तेलंगणा राज्यातील परिवार तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन परत आपल्या गावी जात होतं.

News18
News18
धाराशिव: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. लग्नाला जाणाऱ्या कारचं टायर फुटलं आणि अनियंत्रित झालेली कार थेट रस्त्याच्या बाजूला दुकानामध्ये शिरली. या अपघातात चहाच्या दुकानातील २ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. जखमीला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
मिळालेल्याा माहितीनुसार,  उमरगा शहरापासून जवळच असलेल्या सोलापूर - हैदराबाद महामार्गावर मंगळवारी दुपारी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या अपघात  माजी नगरसेवक बळी पवार आणि जनता अर्थ मुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद यांचा मृत्यू झााला आहे.
तेलंगणा राज्यातील परिवार तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी देवीचं दर्शन घेऊन परत आपल्या गावी जात होतं. उमरगा चौरस्ता जवळील भारत टायरजवळ अचानक कार क्रमांक टि.एस. 34 एफ 4706 या भरधाव कारचे टायर फुटले.
advertisement
टायर फुटल्यामुळे वाहनावरील वाहन चालकाचा ताबा सुटून महामार्गाच्या बाजूस असलेल्या चहाच्या स्टॉलमध्ये शिरला. यावेळी चहाच्या स्टॉलमध्ये चहा घेत बसलेले ग्राहकांना जोराची धडक दिली. कारचा वेग इतका होती की, धडक दिल्यामुळे चहाच्या स्टॉलसमोर उभी असलेली एका दुचाकीचा पार चक्काचूर झाला. या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आणि जागेवरच त्यांचा मृत्यू झाला.
advertisement
अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेतली आणि जखमी झालेल्या व्यक्तींना तातडीने रुग्णालयात घेऊन गेले.  या अपघातामध्ये उमरगा येथील माजी नगरसेवक बळी पवार आणि जनता अर्थ मुव्हर्सचे मालक लाडनशहा मुर्शद या दोघांचा जागीच मृत्यू झाला असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिली आहे. तर मेकॅनिक सचिन कुठार हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
advertisement
अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.  या भीषण अपघातात निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्यामुळे शहरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवीचं दर्शन घेऊन परत जात होते, टायर फुटलं अन् कार चहाच्या स्टॉलमध्ये शिरली, 2 जणांचा जागीच मृत्यू
Next Article
advertisement
Gold News: बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले; शेतकरी एका झटक्यात झाला मालामाल
बदक कापायला घेतला अन् पोटात निघालं 'सोनं', घबाड पाहून गावकरी चक्रावले
  • अजब नशिबाची गजब गोष्ट

  • बदकाने अंडी नाही तर चक्क 'सोनं' दिलं

  • पाहा काय आहे नेमका प्रकार

View All
advertisement