वजन कमी करण्याबद्दल विविध उपाय उपलब्ध असतात. पण वजन वाढवण्यासाठी काय करायचं असा प्रश्न येतो तेव्हा माहिती शोधावी लागते. त्यामुळे, वजन वाढवण्याचा खूप प्रयत्न करत असाल तर काही घरगुती उपाय नक्की मदत करु शकतील.
Lungs Health : प्रत्येक श्वासासाठी फुफ्फुसं हवीत मजबूत, घरी करु शकता क्षमता चाचणी
कमी वेळात निरोगी पद्धतीनं वजन वाढवायचं असेल तर खजूर आणि चणे हा चांगला पर्याय आहे. हे दोन्ही अन्न घटक पोषणाचा खजिना आहेत. वजन वाढवण्यासाठी खजूर आणि चणे स्मूदीत मिसळून खाऊ शकता. याशिवाय, त्याचा शेक बनवू शकता किंवा नुसतं खाऊ शकता.
advertisement
चणे खाण्याचे फायदे
भाजलेले चणे खाल्ल्यानं वजन सहज वाढू शकतं. त्यात प्रथिनं, कॅल्शियम, फायबर, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक असतात, यामुळे शरीराला चांगलं पोषण मिळतात.
खजूर खाण्याचे फायदे
खजूर हा चवीबरोबरच आरोग्याचा खजिना असल्याचं म्हटलं जातं. खजुरात कॅलरीज, कर्बोदकं, फायबर, जीवनसत्त्व आणि खनिजं यांसारखे पोषक घटक असतात. यामुळे निरोगी पद्धतीनं वजन वाढवण्यास मदत होते.
Scrub : संत्र्यांच्या सालाचा स्क्रब करेल त्वचा मुलायम, त्वचेसाठी करा संत्र्यांचा असा उपयोग
याव्यतिरिक्त, आहारात चणे, खजूर, रताळं, भात, विविध डाळी, दूध, बटाटे खाण्याचा सल्ला दिला जातो. तसंच सुकामेवा, दूध, फळं, भाज्या हे पर्यायही आहेत. फळं-भाज्यांमधल्या खनिजं आणि जीवनसत्त्व शरीराला आवश्यक आहेत. वजन वाढवणं, स्नायूंची चांगली वाढ यासाठी पुरेशी झोप आवश्यक आहे. याव्यतिरिक्त, शरीराच्या चांगल्या कार्यक्षमतेसाठी पुरेसं पाणी पिणं आवश्यक आहे. यासोबत तुम्ही नारळाचं पाणी पिऊ शकता.
वजन वाढवण्यासाठी व्यायाम हा चांगला पर्याय आहे. पण शरीराच्या क्षमतेच्या दृष्टीनं कोणता व्यायाम करायचा, कसा करायचा याचा सल्ला घेणं आवश्यक आहे. कारण एखादा चुकीचा व्यायाम स्नायूंना दुखापत करु शकतो.
