Scrub : संत्र्यांच्या सालाचा स्क्रब करेल त्वचा मुलायम, त्वचेसाठी करा संत्र्यांचा असा उपयोग

Last Updated:

हात आणि पायांची काळजी घेण्यासाठी स्क्रब शोधत असाल तर संत्र्याचा वापर करुन चांगला स्क्रब तयार करता येतो. सहसा संत्र्याची सालं फेकून दिली जातात. पण ही सालं त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात.

News18
News18
मुंबई : फेस स्क्रब किंवा बॉडी स्क्रब वापरत असाल तर एक सोपा उपाय. हात आणि पायांची काळजी घेण्यासाठी स्क्रब शोधत असाल तर संत्र्याचा वापर करुन चांगला स्क्रब तयार करता येतो. सहसा संत्र्याची सालं फेकून दिली जातात. पण ही सालं त्वचेसाठी फायदेशीर ठरु शकतात.
संत्र्याच्या सालींचा स्क्रब बनवण्यासाठी, सर्वप्रथम संत्र्याची साल, तांदूळ आणि हळद मिक्सरमधे बारीक करून घ्या. बारीक पावडर तयार झाल्यावर त्यात गुलाबपाणी किंवा पाणी घाला आणि थोडी कॉफी पावडर घालून पेस्ट तयार करा.
advertisement
हा स्क्रब हात आणि पायांवर घासल्यानं मृत त्वचेच्या पेशी निघून जातात, त्वचेवर चमक येते आणि त्वचेवरचं टॅनिंग निघून जातं. हे स्क्रब आठवड्यातून एकदा वापरता येतं.
संत्र्याच्या सालीचे फायदे
संत्र्याच्या सालीत व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं आणि त्यात त्वचा उजळ करण्याचे गुणधर्म असतात.
advertisement
ही सालं त्वचेला एक्सफोलिएट करतात आणि मृत त्वचेच्या पेशी काढून टाकतात, ज्यामुळे त्वचा मऊ वाटते. संत्र्याच्या सालीतील अँटीमायक्रोबियल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्मांमुळे, मुरुमांची समस्या कमी होते.
संत्र्याच्या सालीतील अँटी-एजिंग गुणधर्मांमुळे त्वचा तरुण राहते. यातले अँटी-ऑक्सिडंट्स, त्वचेला नुकसान करणाऱ्या घटकांशी लढतात. या सालींचा वापर विशेषतः टॅनिंगपासून मुक्त होण्यासाठी केला जाऊ शकतो. या सालींमुळे सन टॅन कमी होतो आणि त्वचा चमकदार दिसते.
advertisement
संत्र्याच्या सालीत दही मिसळून फेस पॅक तयार करता येतो. दह्याव्यतिरिक्त, साधं पाणी किंवा कोरफडीनं पेस्ट बनवून देखील वापरू शकता. संत्र्याच्या साली गुलाबपाणी किंवा दह्यात मिसळल्या तर त्या चेहऱ्यावर फेस मास्क म्हणून लावता येतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Scrub : संत्र्यांच्या सालाचा स्क्रब करेल त्वचा मुलायम, त्वचेसाठी करा संत्र्यांचा असा उपयोग
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement