TRENDING:

Diwali Skin Care - दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी बनवा अँटी एजिंग फेस मास्क...फक्त 3 गोष्टी वापरा, चेहरा दिसेल सुंदर

Last Updated:

अँटी एजिंग मास्क वापरुन चेहऱ्याचं सौंदर्य खुलवता येईल. घरीच मिळणाऱ्या जिन्नसांचा वापर यासाठी करता येतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : दिवाळी म्हटलं की सेलिब्रेशन...आणि सेलिब्रेशनचे फोटो ...या फोटोत आपणही सुंदर दिसावं असं कोणालाही वाटेल. यासाठी काही फेस मास्कचे पर्याय...त्वचेवर दिसणाऱ्या सुरकुत्या आणि बारीक रेषा एका रात्रीत कमी होऊ शकत नाहीत, परंतु त्वचेची नियमित काळजी घेतली तर त्वचा टवटवीत दिसेल. या मास्कमुळे त्वचेचा टोन टिकवून ठेवण्यासाठी उपयोग होतो. या फेस मास्कमुळे, त्वचेवर चमक येते, त्वचेच्या मृत पेशी काढून टाकल्या जातात आणि सुरकुत्या कमी करण्यास मदत होते.
News18
News18
advertisement

हा फेस मास्क कसा तयार करायचा ते पाहूया.

केळी, मध, लिंबाचा रस -

हा अँटी एजिंग फेस मास्क बनवण्यासाठी तुम्हाला केळी, मध आणि लिंबाचा रस घ्यावा लागेल. सर्व प्रथम, केळी मॅश करा आणि त्यात एक चमचा मध आणि थोडा लिंबाचा रस घाला. हा अँटी एजिंग फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 20 ते 25 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा. हा फेस पॅक आठवड्यातून एकदा चेहऱ्यावर लावता येतो. केळी त्वचेला दाहक-विरोधी गुणधर्म देण्यासोबतच नैसर्गिक बोटोक्स आणि मधासारखं काम करतात, त्यामुळे त्वचेची आर्द्रता कायम राखता येते.

advertisement

Skin Care - चेहऱ्यावरचे डाग घालवण्यासाठी करा बेसनाचा वापर... फक्त या 2 गोष्टी मिक्स करून चेहऱ्यावर लावा...चेहरा दिसेल तजेलदार

या टिप्स देखील ठरतील उपयुक्त -

  • सुरकुत्या आणि चेहऱ्यावरच्या बारीक रेषा कमी करण्यासाठी एक चमचा लाल मसूर बारीक करून त्यात २ चमचे बेसन मिसळा. हा फेसपॅक पाणी वापरुन तयार करा आणि चेहऱ्यावर लावा, अर्धा तास ठेवा आणि नंतर धुवा. त्वचेवर चांगली चमक येते.
  • advertisement

  • लिंबाच्या रसात दही मिसळून चेहऱ्याला लावता येईल. यासाठी 2 चमचे दही आणि एक चमचा लिंबाचा
  • रस घेऊन मिक्स करा. हे मिश्रण चेहऱ्यावर लावून 10 ते 15 मिनिटं ठेवा आणि नंतर धुवा.

सतत थकवा, अस्वस्थता जाणवतेय? शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल, या सवयी वाढवतील अडचणी

  • हळद आणि दही एकत्र मिसळूनही लावता येईल. यामुळे चेहरा केवळ चमकत नाही तर त्वचेवर साचलेली
  • advertisement

    घाणीचे थरही दूर होतात आणि त्वचा, त्वचेची काळजी घेणारी उत्पादनं अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेण्यासाठी सक्षम होते.

  • त्वचेला अँटी एजिंग गुणधर्म देण्यासाठी, चेहरा तांदळाच्या पाण्याने धुता येतो. टोनर म्हणूनही
  • तांदळाचं पाणी चेहऱ्यावर लावता येतं. त्वचा सुधारते आणि वृद्धत्वाची लक्षणंही कमी होऊ लागतात.

या टिप्सचा नक्की वापर करा. तुम्हाला दिवाळीच्या शुभेच्छा !

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diwali Skin Care - दिवाळीत सुंदर दिसण्यासाठी बनवा अँटी एजिंग फेस मास्क...फक्त 3 गोष्टी वापरा, चेहरा दिसेल सुंदर
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल