Cholesterol Symptoms: सतत थकवा, अस्वस्थता जाणवतेय? शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल, या सवयी वाढवतील अडचणी

Last Updated:

कोलेस्टेरॉलचं जास्त प्रमाण रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा करतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतं. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Cholesterol Symptoms: सतत थकवा, अस्वस्थता जाणवतेय? शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल, या सवयी वाढवतील अडचणी
Cholesterol Symptoms: सतत थकवा, अस्वस्थता जाणवतेय? शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल, या सवयी वाढवतील अडचणी
मुंबई: हृदयविकार, डायबेटीस यांसारखे आजार असतील तर त्या रुग्णासाठी कोलेस्टेरॉल हा महत्त्वाचा घटक असतो. हृदयाच्या आरोग्यासाठी कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात असणं गरजेचं आहे. कोलेस्टेरॉलचं प्रमाण वाढलं असेल तर शरीरात काही विशिष्ट लक्षणं दिसू लागतात. कोलेस्टेरॉलबाबत सविस्तर जाणून घेऊया. कोलेस्टेरॉल हा सायलेंट किलर मानला जातो. हाय कोलेस्टेरॉलची सुरुवातीची काही लक्षणं सहज दिसतात. त्यामुळे वेळीच उपचार घेता येऊ शकतात. हाय कोलेस्टेरॉलची समस्या आनुवंशिक असू शकते. लवकर निदान झाल्यास त्याची पातळी नियंत्रित ठेवता येते आणि हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं.
कोलेस्टेरॉल हा मेणासारखा, चरबीसारखा पदार्थ असतो. तो आपल्या शरीरासाठी उपयुक्त असतो. लिपोप्रोटिन्स हे गोलाकार कण असतात. ते लिपिड्स (फॅट्स) आणि प्रोटीनपासून बनलेले असतात. हे कण रक्ताद्वारे कोलेस्टेरॉल आपल्या शरीरात फिरवतात. लिपोप्रोटीन अर्थात एलडीएल हे हानिकारक मानलं जातं, तर एचडीएल हे गुड कोलेस्टेरॉल मानलं जातं. कोलेस्टेरॉलचं जास्त प्रमाण रक्तवाहिन्यांमध्ये प्लाक जमा करतं आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करू शकतं. त्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. लिव्हरमध्ये कोलेस्टेरॉल नैसर्गिकरीत्या तयार होत असलं, तरी ते मांस, अंडी आणि चीजमध्येही आढळते. तुम्ही घरीच कोलेस्टेरॉलची पातळी तपासू शकता.
advertisement
एलडीएलची पातळी अनेक कारणांमुळे वाढू शकते. त्यात आहार हा महत्त्वाचा घटक असतो. तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेलं मांस आणि भाजलेल्या पदार्थांसारख्या ट्रान्स फॅट्सचं सेवन केल्याने एलडीएल पातळी वाढते. लठ्ठपणा किंवा जास्त वजनामुळे एलडीएलच्या पातळीवर परिणाम होतो. बैठी जीवनशैली, प्रक्रिया केलेल्या आणि अनसॅच्युरेटेड फॅट्सचा आहारात समावेश, डायबेटीस टाइप-2 आणि हायपोथायरॉयडिझम यांसारखे आजार कोलेस्टेरॉल पातळी वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात.
advertisement
यंदाच्या दिवाळीत बिनधास्त खा गोड पदार्थ, Blood Sugar चं Tension नाही, करा हा उपाय
कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर डोळे आणि सांध्याभोवती लहान पिवळसर गाठ किंवा सूज आल्यासारखी दिसते. ''स्टॅटपर्ल्समध्ये'' प्रकाशित झालेल्या प्रबंधानुसार, या स्थितीला झांथेलास्मा पाल्पेब्ररम असं म्हणतात. ही एक सौम्य स्थिती असते. या ठिकाणी कोलेस्टेरॉल असलेले मऊ, अर्धघन, पिवळे पॅप्युल्स किंवा प्लाक दिसतात.
advertisement
कोलेस्टेरॉल वाढलं असेल तर अनावश्यक थकवा जाणवतो, असं ''जर्नल ऑफ सायकोसोमॅटिक रिसर्च''मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात म्हटलं आहे. कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी हे थकव्याचं थेट कारण नसतं. त्यामुळे शरीरात निर्माण झालेल्या समस्यांमुळे थकवा जाणवतो. रक्तपुरवठा करणाऱ्या धमन्यांमध्ये प्लाक साठल्यानेदेखील थकवा जाणवू शकतो.
कोलेस्टेरॉलची पातळी वाढली असेल तर छातीत असह्य वाटतं. याला अन्जायना म्हणतात. शारीरिक हालचालींवेळी दम लागणं हे या स्थितीचं सुरुवातीचं लक्षण आहे. यामुळे रक्ताभिसरण कार्यक्षमतेने होत नाही.
advertisement
सतत थकवा येणं, छातीत अस्वस्थता किंवा त्वचेवर चरबी जमा होणं यांसारखी लक्षणं दिसल्यास तातडीने डॉक्टरांना भेटावे. तुम्हाला हृदयविकाराचा कौटुंबिक इतिहास किंवा हाय एलडीएल असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. प्रतिबंधात्मक उपाय केल्यास मोठा फरक पडू शकतो. तुम्हाला काही समस्या जाणवत नसेल तरीदेखील कोलेस्टेरॉलची नियमित तपासणी करावी. तुमचं वय 40 पेक्षा जास्त असेल, लठ्ठपणा, डायबेटीस किंवा उच्च रक्तदाबासारखे आजार असतील तर कोलेस्टेरॉल तपासणी गरजेची आहे. याकडे दुर्लक्ष केल्यास हृदयविकाराचा झटका किंवा स्ट्रोकसारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
advertisement
उच्च कोलेस्टेरॉलच्या सुरुवातीच्या लक्षणांचं व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत बदल करावा. एलडीएल पातळी मर्यादेत ठेवण्यासाठी डॉक्टर नियमित व्यायाम, आहारात बदल आणि वजन कमी करण्याचा सल्ला देतात. काही रुग्णांमध्ये हे उपाय पुरेसे ठरत नसतील तर गुंतागुंत टाळण्यासाठी डॉक्टर स्टॅनिनसारखी औषधं लिहून देतात.
कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी वेगाने चालणं, पोहणं किंवा योगासनं यांसारखे व्यायाम एचडीएल वाढवण्यास आणि एलडीएल कमी करण्यास मदत करतात.
advertisement
वजन नियंत्रणात ठेवावं. बॉडी मास इंडेक्स थोडा जरी कमी झाला तरी त्याचा सकारात्मक परिणाम कोलेस्टेरॉल पातळीवर दिसतो. धूम्रपान थांबवल्यास एचडीएल पातळी वाढते. हृदयाचं आरोग्य सुधारतं. तसंच मर्यादित मद्यपान केल्यास ट्रायग्लिसराइड्स आणि एलडीएलची पातळी कमी होते. तसंच तणाव व्यवस्थापन महत्त्वाचं आहे.
एलडीएल पातळी कमी करण्यासाठी ओट्स, बीन्स, फळं आणि भाज्या यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. तसंच ऑलिव्ह ऑइल, अॅव्होकॅडो, नट्समधले निरोगी फॅट्सदेखील कोलेस्टेरॉलसाठी उपयुक्त आहेत. साखरयुक्त पदार्थ, पेयं मर्यादित प्रमाणात खावेत.
कोलेस्टेरॉल नियंत्रणासाठी नियमितपणे लिपिड प्रोफाइल तपासणी करावी. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, 20 वर्षं आणि त्याहून जास्त वयोगटातल्या व्यक्तींनी दर चार ते सहा वर्षांनी ही तपासणी केली पाहिजे. जर हाय एलडीएल पातळी, हृदयविकाराचा इतिहास, अकाली कोरोनरी धमनी विकार किंवा एलडीएलची पातळी 190 पेक्षा जास्त असेल तर अशांनी ही तपासणी नियमितपणे करावी.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol Symptoms: सतत थकवा, अस्वस्थता जाणवतेय? शरीरात वाढलंय कोलेस्ट्रॉल, या सवयी वाढवतील अडचणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement