Cholesterol Diet Plan: कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा 'हे' बदल, कमी होईल समस्या

Last Updated:

Cholesterol Diet Plan: शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण करण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत; पण जीवनशैलीत काही बदल केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते.

Cholesterol Diet Plan: कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा 'हे' बदल, कमी होईल समस्या
Cholesterol Diet Plan: कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा 'हे' बदल, कमी होईल समस्या
मुंबई: बदलती जीवनशैली आणि चुकीच्या खाण्याच्या सवयीमुळे डायबेटीस, हृदयविकार आदी गंभीर आजार होण्याचं प्रमाण वाढत आहे. कोलेस्टेरॉल वाढणं हीदेखील एक गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल वाढल्याने हृदयविकार, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारखे जीवघेणे आजार होतात. शरीरात वाढलेलं कोलेस्टेरॉलचं प्रमाण करण्यासाठी औषधं उपलब्ध आहेत; पण जीवनशैलीत काही बदल केल्यास कोलेस्टेरॉलची पातळी कमी होऊ शकते. कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य ठेवण्यासाठी काय उपाययोजना करता येतात, ते जाणून घेऊ या.
कोलेस्टेरॉल वाढणं ही एक गंभीर समस्या आहे. कोलेस्टेरॉल हा रक्तात आढळणारा मेणचट किंवा चिकट पदार्थ असतो. लिव्हर कोलेस्टेरॉल तयार करतं किंवा तुम्ही जे पदार्थ खाता त्यापासून कोलेस्टेरॉल तयार होतं. आरोग्यासाठी कोलेस्टेरॉल गरजेचं आहे; पण जेव्हा त्याची पातळी वाढते तेव्हा गंभीर समस्या तयार होतात. शरीरात कोलेस्टेरॉलची पातळी जास्त वाढली तर हृदयविकार, स्ट्रोक किंवा हृदयविकाराचा झटका यांसारखे आजार होतात. वर्ल्ड हार्ट फेडरेशन अर्थात डब्ल्यूएचओएफच्या माहितीनुसार, हाय कोलेस्टेरॉलमुळे दर वर्षी 4.4 दशलक्ष जणांचा मृत्यू होतो. एकूण मृत्यूंपैकी हे प्रमाण 7.8 टक्के आहे.
advertisement
  1. शरीरातली कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मिठाचा समावेश कमी प्रमाणात करावा.
  2. आहारात फळं, भाज्या, कडधान्यांचा समावेश जास्त प्रमाणात असावा.
  3. डब्ल्यूएचएफच्या माहितीनुसार, कोलेस्टेरॉलची पातळी वाढू नये यासाठी धूम्रपान कमी प्रमाणात करावं. तसंच रोज किमान 30 मिनिटं व्यायाम करावा. तसंच मद्यपान टाळावं. तणावापासून दूर राहावं.
  4. आहारात मांस समाविष्ट असेल तर कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी मांसाचं सेवन कमी करावं. कारण त्यातल्या फॅटमुळे कोलेस्टेरॉल वेगाने वाढतं. त्याऐवजी हेल्दी फॅटयुक्त पदार्थ खावेत. वजन नियंत्रणात ठेवावं.
  5. कोलेस्टेरॉल नियंत्रणात ठेवणं अवघड आहे, असं तुम्हाला कदाचित वाटत असेल; पण त्याची सुरुवात फक्त कोलेस्टेरॉल पातळी तपासणीपासून करावी लागते.
advertisement
डब्ल्यूएचएफने दिलेल्या माहितीनुसार, स्टेटिनसारखी काही औषधं कोलेस्टेरॉल कमी करण्यास किंवा त्यामुळे होणारं नुकसान कमी करण्यास मदत करतात; पण तुम्ही जीवनशैलीत सुधारणा करूनदेखील कोलेस्टेरॉलची वाढलेली पातळी कमी करू शकता.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Cholesterol Diet Plan: कोलेस्ट्रॉलच्या समस्येने त्रस्त आहात? मग आहारात करा 'हे' बदल, कमी होईल समस्या
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement