यंदाच्या दिवाळीत बिनधास्त खा गोड पदार्थ, Blood Sugar चं Tension नाही, करा हा उपाय

Last Updated:

मिठाई पाहिल्यानंतर जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.

मिठाई पाहिल्यानंतर जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मिठाई पाहिल्यानंतर जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
भारतीय संस्कृतीत दिवाळी सणाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी घरोघरी दीपोत्सव साजरा केला जातो. दिवाळीच्या काळात लाडू, करंजी, चकली, चिवडा असे फराळाचे विविध पदार्थ बनवले जातात. यामध्ये गोड पदार्थांचादेखील समावेश असतो. डायबेटीस अर्थात मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी दिवाळी फराळ करताना विशेष काळजी घेणं गरजेचं असतं.
दिवाळीचा सण सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. सर्वच वयोगटातल्या व्यक्ती हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. दिवाळीच्या काळात एकमेकांना मिठाईदेखील दिली जाते. मिठाई पाहिल्यानंतर जवळजवळ प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. अशा परिस्थितीत मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी आहाराची विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. कारण दिवाळीच्या काळात स्वतःला मिठाई खाण्यापासून रोखलं नाही, तर साखरेची पातळी वाढू शकते. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत, ज्यांचं पालन केल्यास तुमची साखरेची पातळी नियंत्रणात राहील आणि सणाचा गोडवादेखील कमी होणार नाही.
advertisement

व्यायामाकडे दुर्लक्ष नको

सणासुदीच्या काळात दिनक्रमामध्ये बदल होत असतो. त्यामुळे दिवाळीच्या काळात तुम्हाला तुमच्या रक्तातली साखर नियंत्रणात ठेवायची असेल, तर दररोज, नियमितपणे व्यायाम करा. सणाच्या काळात दिनचर्येकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.
advertisement
मधुमेह रुग्णांनी दिवाळीच्या काळात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले पदार्थ खावेत. त्यामुळे शरीरातली साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होईल. संत्री, सफरचंद, डाळिंब, काकडी, भोपळा यांसारखी फळं आणि भाज्या कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गटामध्ये येतात. याशिवाय तुम्ही दूध, चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थही सेवन करू शकता.

दारू पिणं टाळा

सणासुदीच्या काळात अनेक जण सेलिब्रेशनच्या मूडमध्ये असतात. अनेक जण जास्त दारू पितात. अल्कोहोलमध्ये साखर आणि कॅलरीज असतात. त्यामुळे साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मद्यपान टाळा. टोमॅटोचा रस, लिंबाचा रस यांसारखी पेयं घेऊ शकता.
advertisement

जास्त गोड खाऊ नका

दिवाळीमध्ये मित्र आणि नातेवाईक एकत्र आल्यानंतर गोड पदार्थ खाण्याचा आग्रह एकमेकांना केला जातो; पण मधुमेही रुग्णांनी खाण्यावर नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे. मिठाई खाताना साखरेची पातळी नियंत्रणात राहील, याची काळजी घ्या.

भरपूर झोप घ्या

सणासुदीच्या काळात मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांच्या भेटीगाठी भरपूर होतात. अनेक कारणांमुळे पुरेशी झोप होत नाही. मात्र मधुमेहींनी पुरेशी झोप घेणं गरजेचं आहे. अन्यथा त्यामुळेदेखील रक्तातल्या साखरेची पातळी वाढू शकते. पुरेशी झोप न घेतल्यानं कॉर्टिसॉलची पातळी वाढल्याने शरीरातली साखरेची पातळीदेखील वाढते. त्यामुळे वेळेवर आणि पुरेशी झोप घ्या.
advertisement
दिवाळी हा सण घरोघरी आनंदात व उत्साहात साजरा होतो. हा सण साजरा करत असताना तुमच्या घरात जर मधुमेहाचा रुग्ण असेल, तर त्याचीही काळजी घेणं महत्त्वाचं आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
यंदाच्या दिवाळीत बिनधास्त खा गोड पदार्थ, Blood Sugar चं Tension नाही, करा हा उपाय
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement