3 सिंपल ट्रिक्स अन् काम फत्ते! 34 दिवसांमध्ये कमी होणार तब्बल 8 किलो वजन, तुम्हीही करा ट्राय
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
रविशा चिनप्पाने काही दिवसांपूर्वी तिचा प्रसुतीनंतर वजन कमी करण्याचा प्रवास इंस्टाग्रामवर शेअर केला. तिने तिच्या दिनचर्येत केवळ तीन बदल करून ३४ दिवसांमध्ये तब्बल ८ किलो वजन कमी केले आहे.
मातृत्व हे प्रत्येक महिलेसाठी अतिशय खास असते. यामुळे त्यांच्या आयुष्यात नवा आनंद येतो. मात्र या आनंदाबरोबरच त्यांच्या दैनंदिन जीवनात खूप मोठी उलथापालथ होते. या महिलांना अनेक शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरे जावे लागते. असाच एक बदल म्हणजे या महिलांचे वाढलेले वजन. प्रसुतीनंतर महिलांच्या शरीराचे आकारमान बदलते. यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. एका महिलेला याच समस्येचा सामना करावा लागत होता. मात्र तिने जे केले आहे ते प्रत्येक गर्भवती आणि नुकतंच आई झालेल्या महिलेसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
दक्षिण आफ्रिकेत राहणाऱ्या भारतीय वंशाची महिला रविशा चिनप्पाने काही दिवसांपूर्वी तिचा प्रसुतीनंतर वजन कमी करण्याचा प्रवास इंस्टाग्राम पेज 'IVF Momma' वर शेअर केला आहे. रविशाने सांगितले की तिने तिच्या दिनचर्येत केवळ तीन बदल करून ३४ दिवसांमध्ये तब्बल ८ किलो वजन कमी केले आहे.
रविशाने सांगितले की प्रसुतीनंतर जवळपास वर्षभर तिचे वाढलेले वजन कमी होत नव्हते. मात्र तिने तिच्या दिनचर्येत फक्त तीन गोष्टींचा समावेश करून तिने ८ किलो वजन कमी केले. या तीन गोष्टी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
advertisement
रतन टाटांच्या 10000 कोटी संपत्तीचं काय होणार? मृत्यूपत्रात पाळीव कुत्र्याला पहिलं स्थान, सावत्र बहिणी...
हायड्रेटेड राहणे
रविशाने सांगितले की ती तिच्या व्यस्त दिनचर्येमुळे पाणी प्यायला विसरायची. जेव्हा तिने नियमित पाणी प्यायला सुरुवात केली, तेव्हा तिला जाणवले की हायड्रेशन वजन कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तिने एक अलार्म सेट केला होता, जो प्रत्येक ९० मिनिटांनी वाजत असे. अलार्म वाजताच ती २० घोट पाणी प्यायची.
advertisement
आहारात प्रोटीनचे प्रमाण वाढवणे
आहारातील प्रोटीनचे प्रमाण वाढवल्याने रविशाची गोड आणि चटपटीत स्नॅक्स खाण्याची लालसा कमी झाली. तिने तिच्या आहारात दररोज १०० ग्रॅम प्रोटीनचा समावेश केला. यामुळे तिचे वजन वेगाने नियंत्रणात आले. इतकंच नाही, तर तिच्या शरीराला आवश्यक पोषकतत्वेही मिळू लागली.
योग्य मानसिकता आणि व्हिज्युअलायझेशन
वजन कमी करण्यात मानसिकता मोठी भूमिका बजावते. रविशाने तिचे आदर्श वजन साध्य करण्यासाठी स्वतःला सकारात्मकरित्या प्रेरित केले आणि मिळणाऱ्या चांगल्या परिणामांची कल्पना केली.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2024 5:55 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
3 सिंपल ट्रिक्स अन् काम फत्ते! 34 दिवसांमध्ये कमी होणार तब्बल 8 किलो वजन, तुम्हीही करा ट्राय


