TRENDING:

Hair Growth : केसांना अशाप्रकारे लावा अंडी, अजिबात येणार नाही वास; केसांच्या वाढीसाठी ही आहे योग्य पद्धत्त

Last Updated:

अंडे केसांसाठी फायदेशीर असतात. अंड्यात व्हिटॅमिन E, फोलेट आणि बायोटिन असतात, जे केसांना पोषण देतात. अंड्याचे केसांवर लावल्याने त्यांना चमक मिळते आणि ड्रायनेस कमी होतो. तसेच, अंडे केस गळणे थांबवण्यासाठी, वाढीसाठी, आणि डॅन्ड्रफ दूर करण्यासाठी उपयुक्त असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
अंडी केवळ शरीरासाठीच नव्हे, तर केसांसाठीदेखील फायदेशीर असतात. अंड्यांचा वापर केसांवर केल्याने अनेक समस्यांचा निवारण होऊ शकतो. अंड्यात व्हिटॅमिन ई, फोलेट आणि बायोटिन असते, जे केसांसाठी खूप फायदेशीर आहे. परंतु अनेक लोकांना अंडी केसांवर कसे लावायचे हे माहीत नसते. आज आपण केसांवर अंडी लावण्याचे पाच वेगवेगळे मार्ग पाहणार आहोत. यामुळे केसांना चमक येईल, ड्रायनेस कमी होईल आणि पांढरे केस येण्यापासून संरक्षण होईल.
News18
News18
advertisement

अंडे आणि व्हिटॅमिन ई : जर तुमचे केस खालून निर्जीव झाले असतील तर अंड्यात व्हिटॅमिन ए मिक्स करून केसांवर लावा. एक अंडं फोडून त्यात थोडं नारळ तेल आणि एक व्हिटॅमिन ई कॅप्सूल घाला. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे मिक्स करून केसांवर लावा.

अंडे आणि ऑलिव्ह ऑइल : जर केसांची वाढ होत नसेल आणि तुम्ही केस वाढवायचे असतील तर अंड्यात ऑलिव्ह ऑइल मिक्स करून लावा. हे केसांना आतून पोषण देईल आणि केसांच्या मुळांना मजबूत करेल. एक अंडं एका बाऊलमध्ये फोडा, त्यात थोडं ऑलिव्ह ऑइल घाला आणि नंतर ते केसांवर लावा.

advertisement

अंडे आणि अलोवेरा जेल : जर तुमचे केस खूप कोरडे असतील तर हा हे लावा. यासाठी एका बाऊलमध्ये एक अंडं फोडून त्यात अलोवेरा जेल घाला. हे मिश्रण केसांवर लावा. हे केसांना आतून मऊ करते आणि कोरडेपणा दूर करते.

केस गळती थांबवण्यासाठी : जर केस खूप जास्त गळत असतील तर एक अंडं फोडून त्यात केळीचा पेस्ट आणि मध मिक्स करा. हा मास्क केसांवर नीट लावा. हा मास्क लावल्याने केसांना चकाकी येते आणि केस गळणे थांबते.

advertisement

अंडे आणि दही : दही केसांमधील डॅन्ड्रफ दूर करते. हे कंडिशनर म्हणूनही काम करते. जर तुमच्या केसांमध्ये खूप डॅन्ड्रफ असेल तर तीन चमचे दही अंड्यात मिक्स करून एक चमचा लिंबाचा रस घालून केसांवर लावा. एक तासानंतर केस शॅम्पू करा.

हे ही वाचा : सात फेरे घेण्याआधी तरुणीचा लग्नाला नकार, त्या रात्री असं नेमकं काय घडलं?

advertisement

हे ही वाचा : SBI च्या ग्राहकांना धक्का! कारसह होम लोन महागलं, किती टक्क्यांनी?

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Hair Growth : केसांना अशाप्रकारे लावा अंडी, अजिबात येणार नाही वास; केसांच्या वाढीसाठी ही आहे योग्य पद्धत्त
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल