TRENDING:

Diabetes : साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे उपाय नक्की करा, खाण्यापिण्याचं तंत्र सांभाळा

Last Updated:

मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : मधुमेह ही जगभरातील प्रमुख समस्यांपैकी एक आहे. मधुमेहाचा धोका कमी करण्यासाठी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. खाण्यापिण्याच्या सवयी आणि जीवनशैलीत बदल करून यावर नियंत्रण ठेवणं शक्य आहे.
News18
News18
advertisement

व्रण तसंच जखमा बऱ्या व्हायला वेळ लागणं, जास्त भूक लागणं, अशक्तपणा आणि थकवा जाणवणं, वारंवार तहान लागणं, वजन कमी होणं ही मधुमेहाची सुरुवातीची लक्षणं आहेत. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी खाण्यापिण्याचं तंत्र सांभाळणं गरजेचं आहे.

advertisement

मधुमेहींनी आपल्या आहाराची विशेष काळजी घेणं खूप आवश्यक आहे. कारण खाण्याच्या सवयींमध्ये थोडासा निष्काळजीपणा झाला तरीही तुमचं आरोग्य बिघडू शकतं.

Skin Care : चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी खास टिप, असा करा खोबरेल तेलाचा वापर

मधुमेहींनी काय खावं ?

1. फळं -

आहारात फळं महत्त्वाची आहेतच. काही फळं खाऊन मधुमेह नियंत्रणात ठेवता येणं शक्य आहे. सफरचंद, संत्री, पेरू, नाशपती आणि बेरी खाल्ल्यानं रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

advertisement

Eye Health : डोळ्यांच्या आरोग्यासाठी आहार महत्त्वाचा, या पदार्थांचा करा समावेश

2. हिरव्या पालेभाज्या-

मधुमेहाच्या रुग्णांसाठी हिरव्या पालेभाज्या जसं की पालक खाणं फायदेशीर आहे. या भाज्यांमध्ये फॅट आणि कॅलरीजचं प्रमाण खूपच कमी असतं, यामुळे शरीरासाठी पालेभाज्या खाणं अधिक उपयुक्त आहे.

3. बिया-

मधुमेही बदाम, भोपळ्याच्या बिया, काजू, तीळ, जवस आणि अक्रोड खाणं फायदेशीर आहे. कारण त्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि अँटीऑक्सिडंट्ससारखे गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात, ज्यामुळे साखर नियंत्रित ठेवण्यास मदत होते.

advertisement

मधुमेहींनी पथ्य पाळली तर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवणं शक्य आहे. गोड पदार्थ, मैदा खाणं टाळणं यासारख्या अनेक सवयींचं पालन करणं मधुमेहींसाठी आवश्यक आहे. याचबरोबर डॉक्टरांचा सल्ला घेणं, वेळेनुसार चाचणी करणं याकडे लक्ष द्या.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Diabetes : साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी हे उपाय नक्की करा, खाण्यापिण्याचं तंत्र सांभाळा
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल