advertisement

Skin Care : चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी खास टिप, असा करा खोबरेल तेलाचा वापर

Last Updated:

चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेची हानी रोखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करता येईल. अनेक जण खोबरेल तेलानं मसाज करतात पण त्यात दही घालून चेहऱ्यावर मसाज केल्यानं चेहरा तजेलदार दिसेल.

News18
News18
मुंबई : उन्हाळ्यामध्ये चेहरा कोरडा होतो. तुम्ही जर दिवसाचा बराच काळ घराबाहेर असाल तर उन्हाच्या झळा, प्रदूषण याचाही परिणाम चेहऱ्यावर दिसून येतो. उन्हामुळे आलेला थकवा, घामामुळे चेहऱ्यावरचा ग्लो कमी होऊ शकतो.
चेहऱ्यावरचा कोरडेपणा कमी करण्यासाठी आणि त्वचेची हानी रोखण्यासाठी खोबरेल तेलाचा वापर करता येईल. अनेक जण खोबरेल तेलानं मसाज करतात पण त्यात दही घालून चेहऱ्यावर मसाज केल्यानं चेहरा तजेलदार दिसेल.
प्रदूषण, तीव्र सूर्यप्रकाश आणि हवेतल्या हानिकारक घटकांमुळे त्वचेला हानी पोहोचते. त्यामुळे कमी वयातच डाग दिसतात आणि त्वचेचा रंगही असमान होतो. त्वचा चमकदार आणि डागरहित ठेवण्यासाठी, त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागेल.
advertisement
त्वचा चमकदार बनवण्यासाठी केमिकल उत्पादनांऐवजी घरगुती उपायांची मदत घ्यायची असेल, तर तुमच्यासाठी खोबरेल तेल उपयुक्त ठरू शकतं.
त्वचेसाठी खोबरेल तेलाचा वापर -
नारळाच्या तेलामध्ये अँटीऑक्सिडंट, अँटीफंगल आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, यामुळे त्वचेला पोषण आणि हायड्रेशन मिळतं. खोबरेल तेलात बेसन, दही आणि हळद मिसळून तुम्ही याचा वापर करू शकता.
advertisement
एका भांड्यात खोबरेल तेल, दही मिसळून घ्या. हे मिश्रण तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेला लावा. तेल त्वचेत चांगल्या रीतीनं शोषेपर्यंत हातानं मसाज करा. सकाळी चेहरा पाण्यानं धुवा.
चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचं पुरळ येत असेल तर हे मिश्रण लावण्याआधी पॅच टेस्ट करा, डॉक्टरांचा सल्ला घ्या.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Skin Care : चेहऱ्यावरच्या ग्लोसाठी खास टिप, असा करा खोबरेल तेलाचा वापर
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement