Vitamin C : थकवा घालवण्यासाठी खा फळं, उन्हाळा होईल सुसह्य
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
व्हिटॅमिन सी पुरवणारे अनेक पदार्थ आहेत, याद्वारे तुम्ही त्याची कमतरता भरून काढू शकता. सामान्यत: व्हिटॅमिन सीचं नाव घेतलं की संत्र आणि लिंबू आठवतं पण या व्यतिरिक्तही असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं.
मुंबई : उन्हाळ्याचा तडाखा वाढतोय, उन्हामुळे येणारा घाम, थकवा या सगळ्यातून स्वत:च्या तब्येतीची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हायड्रेटेड राहणं म्हणजे शरीराला आवश्यक तितकं पाणी पिणं. त्याचसोबत थकवा घालवण्यासाठी एरवीही आणि उन्हाळ्यात जास्त प्रमाणात व्हिटॅमिन-सीची गरज भासते.
व्हिटॅमिन-सी शरीरासाठी खूप महत्त्वाचं मानलं जातं. याच्या कमतरतेमुळे शरीर दुखणं, कमकुवत दृष्टी आणि थकवा यासारख्या समस्या उद्भवू शकतात. शरीर निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून संरक्षण करण्यासाठी अनेक जीवनसत्त्वं आणि पोषक घटक आवश्यक आहेत.
व्हिटॅमिन सी पुरवणारे अनेक पदार्थ आहेत, याद्वारे तुम्ही त्याची कमतरता भरून काढू शकता. सामान्यत: व्हिटॅमिन सीचं नाव घेतलं की संत्र आणि लिंबू आठवतं पण या व्यतिरिक्तही असे अनेक पदार्थ आहेत ज्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं.
advertisement
व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर मात करण्यासाठी काय खावं ?
1. अननस-
अननसात व्हिटॅमिन सी आणि ब्रोमेलेन नावाचे घटक आढळतात. ब्रोमेलेन हे पाचक एंझाइम आहे, ज्यामुळे अन्न पचण्यास मदत करते. 'व्हिटॅमिन सी'साठी हे फळ उपयुक्त आहे.
advertisement
2. पालक-
पालकामध्ये लोह आणि व्हिटॅमिन सी व्यतिरिक्त व्हिटॅमिन ए, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम आणि बीटा कॅरोटीन इत्यादी घटक मुबलक प्रमाणात आढळतात. त्याचा आहारात समावेश केल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
3. स्ट्रॉबेरी-
स्ट्रॉबेरी हा व्हिटॅमिन सीसाठी चांगला स्रोत आहे. शरीराच्या तंदुरुस्तीसाठी तुम्ही अनेक प्रकारे याचा वापर करू शकता. स्ट्रॉबेरी नुसती खाऊ शकता, किंवा सॅलड किंवा मिल्कशेकच्या रुपातही सेवन करु शकता.
advertisement
4. लिंबू-
लिंबू व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. उन्हाळ्यात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेवर अनेक प्रकारे आहारात लिंबाचा समावेश करून मात करता येते. नुसतं लिंबू, सॅलडमधे लिंबाचा रस पिळा, किंवा लिंबू सरबत प्या. तसंच रोजच्या जेवणाच्या ताटातही लिंबू आवर्जून खा.
उन्हाळ्यात तब्येतीची काळजी घ्या, प्रकृतीला जपा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 21, 2025 12:53 PM IST