Periods : पाळीच्या दिवसातल्या पायदुखीवर हे उपाय करुन बघा, वेदना होतील कमी
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
शारीरिक हालचालींचा अभाव, खराब आहार, पाणी कमी पिणं किंवा तणाव यासारख्या जीवनशैलीतील मोठ्या बदलांमुळे मासिक पाळी दरम्यान पाय दुखू शकतात. यामुळे, तुमच्या पायात जडपणा येऊ शकतो आणि वेदना वाढू शकतात. पाय दुखणं, पेटके येणं यासाठी काही घरगुती उपाय उपलब्ध आहेत.
मुंबई : मासिक पाळी म्हणजे स्रियांच्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा टप्पा. पाळी दरम्यान प्रत्येक महिलेला दुखतं असं नाही पण काहींच्या वेदना खूप जास्त असतात. अनेक महिलांना कंबर, पाय दुखतात. काहींना पायात पेटकेही येतात. काहींना ओटीपोटात कळा जातात. तुम्हालाही मासिक पाळी दरम्यान पाय दुखत असतील तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी काही सोपे उपाय करता येतील. पण वेदना अती तीव्र असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.
21 ते 35 दिवसांच्या दरम्यान मासिक पाळी येते. या काळात काही महिलांना शारीरिक आणि मानसिक बदलांना सामोरं जावं लागतं. काहींचं पोट दुखतं, काहींना मूड सतत बदलणं, पोट फुगणं अशीही लक्षणं मासिक पाळी दरम्यान जाणवतात. परंतु काही महिलांना पायात तीव्र वेदना आणि पेटके येतात.
advertisement
शारीरिक हालचालींचा अभाव, खराब आहार, पाणी कमी पिणं किंवा तणाव यासारख्या जीवनशैलीतील मोठ्या बदलांमुळे मासिक पाळी दरम्यान पाय दुखू शकतात. यामुळे, पायात जडपणा येऊ शकतो आणि वेदना वाढू शकतात. प्रोस्टॅग्लँडिन हार्मोन मासिक पाळीच्या दरम्यान तयार होतो. या हार्मोनमुळे पाय दुखू शकतात. मासिक पाळीच्या नंतरही पाय दुखणं आणि पेटके येणं कायम राहिलं तर ते एखाद्या गंभीर आजाराचं लक्षण असू शकतं. त्यामुळे ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा.
advertisement
- कोमट पाण्यात सोडियम बायकार्बोनेट किंवा ऍस्पिरिन मिसळून आंघोळ केल्यानंही वेदनांपासून आराम मिळतो.
- पायांना मसाज केल्यानं रक्ताभिसरण सुधारतं, ज्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते.
- या काळात जास्तीत जास्त विश्रांती घ्या. विश्रांतीमुळेही तुम्हाला बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो.
- एरवीही आणि या काळातही शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका. पुरेसं पाणी पित राहा.
- वेदनाशामक औषधांमुळे वेदना कमी होऊ शकतात, पण ही औषधं घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 20, 2025 6:51 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Periods : पाळीच्या दिवसातल्या पायदुखीवर हे उपाय करुन बघा, वेदना होतील कमी