World Oral Health Day : जागतिक मौखिक आरोग्य दिवस, दातांच्या आरोग्याची काळजी घ्या

Last Updated:

मौखिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा केला जातो. काही कारणांमुळे दात पिवळे पडतात. याकडे दुर्लक्ष न करता, दातांची योग्य काळजी घेण्याची गरज आहे. योग्य काळजी घेतली तरच दात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.

News18
News18
मुंबई : आज 20 मार्च. हा दिवस जागतिक मौखिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. दिवसभरात आपण जे खातो - पितो ते मुखातून पोटात जातं. अशावेळी तोंड स्वच्छ नसेल तर आरोग्यासंबंधी विविध समस्या उद्भवू शकतात. काही कारणांमुळे दात पिवळे पडतात. याकडे दुर्लक्ष न करता, दातांची योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. योग्य काळजी घेतली तरच दात स्वच्छ आणि चमकदार दिसतील.
मौखिक स्वच्छतेचं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी, दरवर्षी 20 मार्च रोजी जागतिक मौखिक आरोग्य दिन साजरा केला जातो. हा दिवस 2007 मध्ये पहिल्यांदा साजरा करण्यात आला आणि 2013 पासून दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. यावर्षी जागतिक मौखिक आरोग्य दिनाची थीम 'हॅपी माउथ इज अ हॅपी माइंड' आहे.
advertisement
दात पिवळे पडणं, दातांवर थर जमा होणं, श्वासाची दुर्गंधी, जिभेवर पांढरेपणा येणं, हिरड्या सुजणं आणि दात किडणं हे मौखिक आरोग्य खराब असल्याची लक्षणं आहेत. तोंडाची योग्य प्रकारे स्वच्छता न करणं हे दात पिवळे होण्याचं प्रमुख कारण आहे.
  • सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी दात स्वच्छ केले नाहीत तर पिवळे पडू शकतात.
  • मौखिक स्वच्छता राखण्यासाठी दातांसोबतच जीभ स्वच्छ करणं गरजेचं आहे.
  • जीभ स्वच्छ केली नाही तर तोंडाला दुर्गंधी येऊ लागते. माऊथवॉशचा वापर दातांवरचा थर काढण्यासाठी येऊ शकतो. या थरामुळे दात किडतात.
  • अनेक खाद्यपदार्थ, कार्बोनेटेड पेयांमुळे दात पिवळे होऊ शकतात.
  • धूम्रपान करणाऱ्यांच्या दातांवरही पिवळसरपणा दिसून येतो. धूम्रपानामुळे दातांच्या वरच्या थराचंही नुकसान होतं.
  • ज्यांना दात जोरात घासण्याची सवय असते त्यांच्या दातांवरचा इनॅमलचा थर पातळ होऊन जीर्ण होऊ शकतो, ज्यामुळे दात पिवळे दिसण्याची समस्या उद्भवते.
advertisement
  • दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी घरगुती उपाय -
  • तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी आणि दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी मिठाच्या पाण्यानं गुळण्या करू शकता.
  • दातांचा पिवळसरपणा दूर करण्यासाठी स्ट्रॉबेरी बारीक करून ब्रशवर ठेवा आणि दातांवर घासून घ्या. दात स्वच्छ होतील.
  • बेकिंग सोड्यानं दात स्वच्छ केल्यानं पिवळेपणा दूर होण्यास मदत होते.
  • केळीच्या सालानंही दात साफ करता येतात. यामुळे दातांवरचा पिवळा थर निघण्यासाठी उपयोग होतो.
  • मीठ आणि लिंबाचा रस एकत्र करून दातांवर चोळल्यामुळेही दात स्वच्छ राहतात.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
World Oral Health Day : जागतिक मौखिक आरोग्य दिवस, दातांच्या आरोग्याची काळजी घ्या
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement