वाढत्या वयाबरोबर त्वचेतील कोलेजनचं उत्पादन कमी होतं, त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या दिसतात आणि त्वचा सैल होऊ लागते. तसंच निस्तेज आणि निर्जीव दिसते. अशावेळी कोलेजनचं उत्पादन वाढवण्यासाठी अनेक सौंदर्य उत्पादनं आणि इंजक्शन्स बाजारात उपलब्ध आहेत. ज्यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढतं. तसंच नैसर्गिकरित्या म्हणजेच आहारातूनही त्वचेच्या कोलेजनचं प्रमाण वाढवण्यासाठी मदत होते.
advertisement
Honey Saffron : मध - केशर - नैसर्गिक औषधांचा खजिना, एकत्र खाण्याचे फायदे भरपूर
हिरव्या पालेभाज्या
पालक, ब्रोकोली यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये कोलेजनची पातळी वाढवणारे गुणधर्म असतात, ज्यामुळे त्वचेची लवचिकता वाढवून सुरकुत्या कमी करण्यासाठी मदत होते.
एवोकॅडो
एवोकॅडोमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई हे घटक असतात. जे त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. एवोकॅडोचा आहारात समावेश केल्यानं कोलेजनचं विघटन रोखण्यास मदत होते.
फॅटी फिश
सॅल्मन आणि मॅकेरल यासारख्या फॅटी माशांमध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिडस भरपूर असतात, त्यांचा आहारात समावेश केल्यानं त्वचेला आवश्यक आर्द्रता मिळते आणि कोलेजनचं उत्पादन देखील वाढतं.
अंड्याचा पांढरा भाग
अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोलिन नावाचं अमिनो ॲसिड आढळतं, यामुळे कोलेजन तयार करण्यास मदत होते आणि यामुळे त्वचा तरुण राहते.
लिंबूवर्गीय फळं
संत्री, लिंबू, लिंबूवर्गीय फळांमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतं, यामुळे कोलेजन निर्मितीसाठी उपयोग होतो.
बेरी
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी आणि रास्पबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी असतं. यामुळे कोलेजन टिकवून ठेवण्यास मदत होते.
सुकामेवा
बदाम, अक्रोड आणि चिया सीड्समध्ये ओमेगा -3 आणि व्हिटॅमिन ई आढळतात, ज्यामुळे त्वचा निरोगी राहते आणि कोलेजनची पातळी वाढवण्यास मदत होते.
टोमॅटो
टोमॅटोमध्ये लाइकोपीन आणि व्हिटॅमिन सी आढळतं, यामुळे त्वचेची हानी रोखून कोलेजन राखण्यासाठी खूप मदत होते.
Lungs : प्रदूषणापासून जपा फुफ्फुसांचं आरोग्य, फुफ्फुसं निरोगी ठेवण्यासाठी हे उपाय नक्की करा
लसूण
लसणामध्ये सल्फर असतं, ज्यामुळे कोलेजन उत्पादनास गती मिळते आणि त्वचेची लवचिकता वाढते.
सोया उत्पादनं
टोफू, सोया मिल्क आणि इतर सोया उत्पादनांमध्ये जेनिस्टीन नावाचे अँटीऑक्सिडेंट असते, ज्यामुळे कोलेजनचं उत्पादन वाढतं.
त्वचेतील कोलेजन वाढवण्याचे फायदे
त्वचेतील कोलेजनची पातळी संतुलित ठेवल्यानं सुरकुत्या कमी होण्यास, त्वचेची लवचिकता आणि आर्द्रता टिकवून ठेवण्यास, त्वचेची चमक वाढण्यास आणि त्वचेचं संरक्षण करण्यासाठी मदत होते.