1. टायफॉइड
टायफॉइड हा एक जिवाणूमुळे होणार संसर्ग आहे. दूषित पाणी किंवा अन्नबाधेनंही हा संसर्ग पसरतो. त्यामुळे सतत ताप येतो आणि रुग्णाला पोटदुखी, उलट्या आणि डोकेदुखी देखील होऊ शकते.
2. ब्रुसेलोसिस
हा एक जिवाणू संसर्ग आहे जो संक्रमित प्राण्यांच्या उत्पादनांच्या संपर्कातून पसरतो. त्यामुळे वारंवार ताप येतो. घाम येणं, स्नायू दुखणं आणि अशक्तपणा देखील असू शकतो.
advertisement
Hair Care : केसांची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक टिप्स, संतुलित आहारानं टिकेल केसांचं आरोग्य
3. यूटीआय - UTI - Urinary track infection -
यूटीआय म्हणजे मूत्रमार्गाच्या संसर्गामुळे लघवी करताना जळजळ होते आणि वारंवार लघवी करावी लागते. यामध्ये ताप देखील येऊ शकतो, संसर्ग मूत्राशयातून मूत्रपिंडात पसरतो तेव्हा ताप येऊ शकतो.
4. ल्युपस
ल्युपस हा एक स्वयंप्रतिकार रोग आहे. शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्या ऊतींवर हल्ला करते.
यामुळे सौम्य ताप वारंवार येऊ शकतो. यासोबतच सांधेदुखी, थकवा आणि त्वचेवर पुरळ उठणं अशी लक्षणं देखील दिसतात.
5. मलेरिया
मलेरिया हा डास चावल्यानं होणारा आजार आहे. यामध्ये थंडी वाजून ताप येतो आणि त्यानंतर तीव्र ताप येतो जो तीन दिवसांच्या अंतरानं परत येतो. यासोबतच घाम येणं, डोकेदुखी आणि थकवा देखील जाणवतो.
Tanning : टॅनिंग काढण्यासाठी नैसर्गिक फेस पॅक, त्वचा दिसेल तजेलदार
6. डेंग्यू
डेंग्यू हा एक विषाणूजन्य आजार आहे जो संक्रमित डासांमुळे पसरतो. त्यामुळे जास्त ताप येतो आणि डोकेदुखी, स्नायू आणि सांधे दुखतात. ताप कमी झाल्यानंतरही तो परत येऊ शकतो.
7. टीबी (क्षयरोग)
टीबी हा हळूहळू पसरणारा जिवाणू संसर्ग आहे, यामुळे फुफ्फुसांवर सर्वात जास्त परिणाम होतो. त्यामुळे विशेषतः संध्याकाळी सौम्य ताप येतो. याशिवाय, रात्री घाम येणं, वजन कमी होणं आणि दीर्घकाळ खोकला ही लक्षणं दिसून येतात.
