श्रावणचा संपूर्ण एक महिना दारू सेवन करणे आणि मांसाहार करणे अनेकजण टाळतात. त्यामुळे काहीजण श्रावण महिन्याच्या अगोदर येणाऱ्या अमावस्येला अर्थात गटारी म्हणून साजरी करतात. या दिवशी पार्टी करून मोठ्या प्रमाणात दारूचे सेवन केले जाते. मेडिकल सायन्समध्ये एकाच वेळी खूप जास्त दारू पिण्याला बिंज अल्कोहोल ड्रिंकिंग असे म्हणतात. अशा प्रकारचे मद्यसेवन शरीरासाठी हानिकारक ठरू शकते, असे डॉक्टर कुलकर्णी सांगतात.
advertisement
Gatari Amavasya: गटारी नव्हे, ही तर गतहारी अमावस्या! मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती
बिंज अल्कोहोल म्हणजे काय?
काहीजण 2 तासांमध्ये 5 पॅक पेक्षा जास्त मद्यसेवन करतात. अशा मद्यपानामुळे आपल्या शरीरातील दारूचे प्रमाण 0.08 ग्रॅम डीसी लिटर पेक्षा जास्त वाढते. तेव्हा शरीराला अपायकारक ठरते. साधारणपणे एवढ्या जास्त प्रमाणात मद्यसेवन केल्यानंतर शरीरातील काही मुख्य बदल होतात. शरीरावरील ताबा सुटणे, स्वादुपिंड दाह यासारख्या आजारामुळे पोटावर सूज येते आणि उलट्या येणे असे प्रकार सुरू होतात, असेही डॉ. कुलकर्णी सांगतात.
मद्यसेवनाचं प्रमाण काय असावं?
शरीरासाठी 30 एमएल मद्यसेवन करणे क्षमतेत आहे. यापेक्षा जास्त मद्यसेवन केल्यास त्याचे अधिक धोके निर्माण होऊ शकतात. त्यामुळे गटारी अमावस्येला तरुणांनी खूप जास्त प्रमाणात मद्यसेवन करू नये. जास्त काळापासून मद्यसेवन करत असल्यास रक्ताची उलटी होण्यासारखा प्रकार घडू शकतो. तसेच जीवावर बेतण्याचा धोकाही निर्माण होऊ शकतो, असेही डॉक्टर सांगतात.





