Gatari Amavasya: गटारी नव्हे, ही तर गतहारी अमावस्या! मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Gatari Amavasya: चातुर्मास सुरू होण्यापूर्वीची पहिली अमावस्या म्हणून आषाढी अमावस्येचं महत्त्व आहे. अनेकजण गटारी अमावस्या असा चुकीचा उल्लेख करतात.
मुंबई : यंदा 24 जुलै 2025, गुरुवार रोजी आषाढ अमावस्या साजरी केली जाणार आहे. हिला दीप अमावस्या, गतहारी अमावस्या असेही म्हणतात. ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असून, यानंतर श्रावण महिन्याची सुरूवात होते. त्यामुळे या अमावस्येला विशेष धार्मिक व शास्त्रीय महत्त्व आहे. या आषाढी आमवस्येनिमित्त पूजा कशी करावी? तसंच अमावस्येचं महत्त्व याबद्दल मुंबईतील आदित्य जोशी गुरुजींनी सांगितलं आहे.
या दिवशी घरातील सर्व दिवे स्वच्छ करून त्यांना तेल घालून देवासमोर लावले जातात. तसेच कणकेचे दिवे करून दक्षिण दिशेला फिरवून ते लावले जातात, जे पितरांच्या पूजनासाठी केले जाते. यामुळे पितरांची कृपा लाभते, असे मानले जाते.
advertisement
गटारी की गतहारी?
आपण सर्वसाधारणपणे या अमावस्येला 'गटारी' अमावस्या म्हणतो आणि मांसाहारी भोजन, जल्लोष याचा अविभाज्य भाग मानतो. परंतु आदित्य जोशी गुरुजींच्या मते, 'गटारी' हा शब्द चुकीचा असून, 'गतहारी' हा मूळ शब्द आहे. हा शब्द 'गत' आणि 'आहार' या शब्दांवरून आला आहे, ज्याचा अर्थ 'सोडलेला आहार' असा होतो. काही लोक या दिवसाला 'गतहारी' असेही म्हणतात, ज्याचा अर्थ 'गेलेला आहार' असा होतो.
advertisement
श्रावण मासात मांसाहार वर्ज्य मानला जातो. यामागे शास्त्रीय कारण देखील आहे. पावसाळ्याच्या दिवसांत मासे प्रजनन करतात आणि पाण्यातील जीवाणूंची वाढ होते. त्यामुळे मांसाहार टाळावा, असे आयुर्वेदात सांगितले आहे.
यंदा गुरुवारी, 24 जुलै रोजी आषाढ अमावस्या आहे. या दिवशी कणकेपासून दिवे तयार करून दक्षिण दिशेस दिवे लावणे शुभ आहे.
मुहूर्त आणि तिथी
दीप अमावस्येचा शुभ मुहूर्त - 24 जुलै 2025
advertisement
तिथी सुरू: 24 जुलै, गुरुवार, सकाळी 7:28 वाजता
तिथी समाप्त: 25 जुलै, शुक्रवार, सकाळी 9:17 वाजता
अमृत काळ: दुपारी 1:30 ते 3:00
राहूकाळ: दुपारी 1:30 ते 3:00
पंचांगानुसार, 24 जुलै रोजी विविध धार्मिक विधी, दीप पूजन व पितर तर्पणासाठी हा उत्तम दिवस मानला जातो.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 23, 2025 10:10 AM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Gatari Amavasya: गटारी नव्हे, ही तर गतहारी अमावस्या! मुहूर्त आणि पूजा पद्धती, संपूर्ण माहिती