Shravan 2025: श्रावण महिन्यात वाहिली जाणारी शिवमूठ म्हणजे काय? काय आहे धार्मिक महत्त्व, Video
- Reported by:Shivani Dhumal
- Published by:Mohan Najan
Last Updated:
श्रावण महिना लवकरच सुरु होत असून श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते आणि श्रावणी सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहिली जाते.
ठाणे: श्रावण महिना लवकरच सुरु होत असून श्रावणी सोमवार हा हिंदू धर्मात विशेष महत्त्व असलेला दिवस आहे, जो श्रावण महिन्यातील सोमवारी साजरा केला जातो. या महिन्यात भगवान शंकराची पूजा-अर्चा केली जाते आणि श्रावणी सोमवारी महादेवाला शिवमूठ वाहिली जाते. शिवमूठ म्हणजे काय आणि ती कशी वाहतात? याविषयीची माहिती ज्योतिषी कुलदीप जोशी यांनी दिली आहे.
याविषयी सांगताना ज्योतिषी कुलदीप जोशी सांगतात, अशी एक मान्यता आहे की ज्यात भगवान शिव आणि पार्वती श्रावण महिन्यात जगाचं पालकत्व घेतात. त्यामुळे या महिन्यात केली जाणारी शिव उपासना ही उच्च कोटीची मानली जाते आणि ती लवकरच फलदायी देखील ठरते. अविवाहित तरुणी देखील या काळात चांगला पती मिळावा यासाठी शिवउपासना करतात.
advertisement
श्रावणामध्ये भगवान शंकरांना बेल पान वाहिले जाते. तुम्ही देखील ओम नमः शिवाय म्हणत भगवान शंकरांना आपल्या इच्छेनुसार बेल अर्पण करू शकता. तसेच त्र्यंबकम यजामहे हा जप देखील तुम्ही श्रावण सोमवारी करू शकता.
श्रावण महिन्यात शिवमूठ का वाहतात?
advertisement
एक पौराणिक महत्त्व या शिवमुठीविषयी सांगितले जाते. माता पार्वतीने भगवान शंकरांना मिळवण्यासाठी शिवमुठीचे हे व्रत केलं होतं आणि त्यामुळे श्रावणी सोमवारी वेगवेगळ्या धान्याची शिवमूठ भगवान शंकराला वाहिली जाते. पहिल्या सोमवारी तांदूळ, दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग, चौथ्या सोमवारी जवस वाहिलं जातं. अविवाहित तरुणीदेखील हे शिवमुठीचे व्रत करू शकतात, असं कुलदीप जोशी सांगतात.
advertisement
श्रावण महिना आला, की सणांची रांगच लागते. नागपंचमी, नारळी पौर्णिमा, रक्षाबंधन, पोळा आणि मंगळागौर यांसारखे सण या महिन्यात उत्साहात साजरे केले जातात. या महिन्यात शंकराच्या भक्तीने मनोभावे प्रार्थना केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात, असा श्रद्धेचा विश्वास आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
Jul 22, 2025 7:44 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Shravan 2025: श्रावण महिन्यात वाहिली जाणारी शिवमूठ म्हणजे काय? काय आहे धार्मिक महत्त्व, Video







