गेल्या 25 वर्षांपासून योगा करून अँड. गोरख दंडवते निरोगी आयुष्य जगत आहेत. ते सांगतात, गेल्या 25 वर्षांपासून योगा करताना अनेक अनुभव आले. योगा केल्यामुळे शारीरिक आरोग्य आणि मानसिक आरोग्य देखील स्वस्थ राहतं. मी 25 वर्षांपासून दररोज सकाळी योगा करतो. योगा केल्यामुळे पूर्ण दिवस हा उत्साही जातो.
advertisement
योगा केल्यामुळे आपला आपल्या शरीरावर ताबा असतो आणि शरीर निरोगी असलं तर पूर्ण दिवसही उत्साही जातो. दिवसभर काम करण्याची ताकद योगा केल्यामुळे मिळते. तसेच योगा केल्यामुळे नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचार येतात. तसेच योगा केल्याने लवचिकता वाढते, रक्तदाब नियंत्रणात राहतो, पचनक्रिया सुधारते, वजन नियंत्रणात राहते, तसेच ताण-तणाव कमी होतो, मानसिक शांतता मिळते. तसेच शरीराला आणि मनाला सकारात्मक ऊर्जा मिळते, त्यामुळे योगा हा गरजेचा आहे.
योगा केल्यामुळे कोणतेही काम करताना ते मनापासून आणि सकारात्मक विचार करून केलं जातं. तसेच योगा केल्यामुळे शारीरिक संतुलन टिकून राहतं आणि मन देखील प्रसन्न राहतं, असे यावेळी बोलताना अँड. गोरख दंडवते यांनी सांगितले.