केस मऊ आणि चमकदार ठेवण्यासाठी निसर्गोपचारतज्ज्ञ डॉ. मनोज दास यांनी सांगितलेला मास्क घरी देखील बनवू शकता आणि लावू शकता.
या हेअर जेलमुळे कुरळे केस पूर्वीपेक्षा अधिक आटोपशीर राहू शकतात. तसंच, केस रेशमी आणि चमकदार बनतात. हेअर जेल बनवण्यासाठी सुमारे चार ग्लास पाणी घ्यावं लागेल. या पाण्यात चार चमचे तांदूळ आणि चार चमचे जवस घाला.
advertisement
हे मिश्रण नीट उकळवा. पाणी चार ग्लासऐवजी दोन ग्लास होईपर्यंत उकळवा. हे तांदूळ आणि जवसाचं जेल गरम असतानाच गाळून घ्या आणि एका कंटेनरमध्ये ठेवा. तांदूळ आणि जवसाच्या बियांपासून बनवलेलं हे जेल शॅम्पू करण्यापूर्वी केसांना लावता येतं.
शॅम्पू करण्यापूर्वी हे जेल केसांच्या मुळांपासून केसांच्या टोकांपर्यंत लावण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
हे जेल डोक्यावर अर्धा तास तसंच राहू द्या आणि नंतर धुवा. केस धुण्यासाठी सौम्य शाम्पूचा वापर करा. या जेलनं केस कुरळे दिसणार नाहीत आणि खूप मऊ होतील.
हे जेल एकाच वेळी भरपूर बनवण्याऐवजी फक्त दोन वेळा बनवा. हे जेल जास्त दिवस ठेवलं तर त्याचा वास येऊ शकतो.
