TRENDING:

Summer Health Drink : नारळ पाण्यानं घालवा अशक्तपणा, उन्हाळ्यात तब्येत राहिल चांगली

Last Updated:

नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, अमीनो अ‍ॅसिड, जीवनसत्व क असे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. कडक उन्हात शरीर ताजंतवानं आणि निरोगी ठेवण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : नारळाच्या झाडाला कल्पतरु का म्हणतात या प्रश्नाचं उत्तर प्रत्येकानं एकदातरी लिहिलं असेल. या झाडाच्या प्रत्येक भागाचा उपयोग होतो. नारळातलं पाणी खूप आरोग्यवर्धक आहे. उन्हाळ्यात दररोज नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला याचे अनेक फायदे मिळू शकतात.
News18
News18
advertisement

नारळाच्या पाण्यात अँटीऑक्सिडंट्स, अमीनो अ‍ॅसिड, जीवनसत्व क असे अनेक महत्त्वाचे पोषक घटक आढळतात. सध्या काही भागात अवकाळी पाऊस पडत असला तरी कडक उन्हात शरीर ताजंतवानं आणि निरोगी ठेवण्यासाठी नारळ पाणी हा सर्वोत्तम पर्याय आहे.

Summer Care: उन्हाळ्यात फळांचा रस देईल ऊर्जा, रोगप्रतिकारक शक्तीही वाढेल, रक्तवृद्धीसाठीही उपयुक्त

दररोज नारळ पाणी पिण्याचे शरीराला अनेक फायदे आहेत. उन्हाळ्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी नारळ पाणी प्यायल्यानं शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. सकाळी नारळ पाणी पिणं सर्वोत्तम मानलं जातं.

advertisement

नारळ पाणी पिण्याचे फायदे

1. पाण्याच्या कमतरतेवर मात करण्यासाठी-

उन्हाळ्यात अनेकदा पाण्याची कमतरता जाणवते. अशा वेळी, शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी नारळ पाणी उपयुक्त ठरतं. कारण त्यात इलेक्ट्रोलाइट्स असतात यामुळे शरीरातील पाणी टिकवून ठेवण्यास मदत होते.

Summer Care: उष्माघात, डिहायड्रेशनचा धोका ओळखा, पुरेसं पाणी प्या आणि या गोष्टी विसरु नका

2. अशक्तपणा घालवण्यासाठी-

advertisement

शरीरात अशक्तपणा जाणवत असेल तर नारळाचं पाणी हा चांगला पर्याय आहे. नारळाच्या पाण्यातल्या अनेक गुणधर्मांमुळे ऊर्जा वाढते आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी याचा उपयोग होतो.

3. वजन कमी करण्यासाठी-

लठ्ठपणा ही आजच्या काळातील सर्वात मोठी समस्या आहे. उन्हाळ्यात स्वतःला तंदुरुस्त ठेवायचं असेल आणि वजन नियंत्रणासाठी दररोज नारळ पाणी पिऊ शकता. शरीराला सर्व आवश्यक घटक यातून मिळतात आणि हे पाणी प्यायल्यानं पोट बराच काळ भरलेलं राहतं, ज्यामुळे जास्त खाणं टाळता येते आणि वजन कमी करता येतं. थोडक्यात फक्त आजारी असताना नाही तर आजारी पडू नये म्हणूनही नारळ पाणी पिणं हा चांगला पर्याय आहे.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Summer Health Drink : नारळ पाण्यानं घालवा अशक्तपणा, उन्हाळ्यात तब्येत राहिल चांगली
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल