कोल्हापूर : फळभाज्यांमधील बऱ्याचशा भाज्यांची साल ही काढून टाकली जाते. मात्र प्रत्येक सालीमध्ये असणारे बरेचसे गुणधर्म हे शरीरासाठी उत्तमच असतात अशाच प्रकारे लसूण या कांद्याच्या परिवारातील कंदमुळाच्या सालीचे देखील शरीरासाठी अनेक गुणकारी उपयोग आहेत. मात्र हे फायदे कित्येकांना ठाऊकच नसतात. त्यामुळे आयुर्वेद तज्ज्ञ असलेल्या कोल्हापुरातील डॉक्टर अनिल कुमार वैद्य यांनी याबाबत माहिती दिली आहे.
advertisement
आपल्याकडे प्रत्येक घरात लसणाची साल ही कचऱ्याच्या टोपलीतच जात असते. लसणाच्या पाकळ्यांचा वापर हा पदार्थांची चव वाढवण्यासाठी केला जातो. मात्र त्याच सोबत लचणाची साल देखील उपयोगात आणली जाऊ शकते. या लसणाच्या सालीचे अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत, असे अनिलकुमार वैद्य यांनी सांगितले.
लसणाच्या सालीचे उपयोग
लसणाचे असंख्य गुणकारी गुणधर्म शास्त्रीय संशोधनाद्वारे सिद्ध झाले आहेत. लसणाप्रमाणे लसणाच्या सालीचेही अनेक फायदे आहेत. लसणाच्या सालीमध्ये जंतुनाशक, बुरशीविरोधी असेही गुणधर्म असतात. त्यामुळे निरुपयोगी वाटणारी लसणाची साल देखील आरोग्यासाठी गुणकारी ठरते.
1. लसणाची साल जर जाळून त्याचे भस्म केले आणि हे भस्म जर बऱ्या न होणाऱ्या जखमेवर मधासोबत लावले तर नक्की गुण येतो. कोणत्याही प्रकारची म्हणजेच अगदी भरून न येणारी जखम जरी असली तरी ती जखम देखील या उपायाने भरण्यास सुरुवात होते.
2. विशेषतः जर घशासंदर्भात समस्या जाणवत असतील. घसा दुखत असेल, ताप येण्याची लक्षणे वाटत असतील, तर अशावेळी लसणाची साल वापरून केलेल्या काढ्याने गुळण्या केल्यास नक्कीच आराम भेटतो.
3. लसणीच्या सालीमध्ये असणाऱ्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी त्याची मदत होतो. लसणाच्या सालीचा चहा हा यासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. असा चहा दररोज घेणे उत्तम ठरते.
हिंदू धर्म विधीतील मंत्रोच्चारात 'स्वाहा' म्हटलं जातं, पण याचा नेमका अर्थ माहितीये का? Video
4. बऱ्याचदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये सूप वेगैरे पदार्थांमध्ये लसणाचा दरवळ त्या पदार्थाला येण्यासाठी लसणाच्या सालीपासून बनवलेल्या पावडरचा वापर केला जातो.
5. लसणाच्या सालींचे केसांसाठीही अत्यंत गुणकारी फायदे आहेत. आठवड्यातून एकदा शाम्पूऐवजी लसणाच्या सालीची पावडर तेलाबरोबर केसांना लावून नंतर केस धुवावेत. यामुळे केस गळती रोखून नवे केस उगवण्यासाठी देखील मदत होते.
दरम्यान, अशाप्रकारे अनेक उपायोगांनी भारलेली लसणाची साल कचऱ्यात फेकून दिली जाते. त्यामुळे असे न करता तिचा योग्य तो वापर करणेच उचित ठरते असेही मत वैद्य यांनी व्यक्त केले आहे.