तुम्ही दिवसातून पाचवेळा सूर्यनमस्कार केले तर तुमच्या शरीरासाठी हे खूपच फायदेशीर आहे. त्यामुळे स्वत:ला सकारात्मक आणि सक्रिय ठेवण्यासाठी तुम्ही दिवसाची सुरुवात निरोगी पद्धतीनं करु शकता. रोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीर लवचिक राहतं, स्नायू बळकट राहतात. सूर्यनमस्कार हा 12 आसनांचा एक संच आहे. पूर्ण प्रकृतीची काळजी घेण्यासाठी सूर्यनमस्कार हा उत्तम पर्याय आहे.
advertisement
पाच वेळा सूर्यनमस्कार करण्याचे फायदे -
- दररोज सूर्यनमस्कार केल्यानं शरीरात लवचिकता येते. स्नायूंसाठी हा चांगला व्यायाम आहे.
- सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील रक्ताभिसरण सुधारतं.
Dry Eye Syndrome: ड्राय आय सिंड्रोम, डोळे कोरडे होत असतील तर वेळीच लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या
- सूर्यनमस्कारांमुळे चयापचयाचा वेग वाढतो आणि वजन कमी होतं.
- कॅलरीज वेगानं बर्न होतात. हा व्यायाम तुमच्या पाय, हात, पाठ आणि पोटाच्या स्नायूंना टोन करण्यासाठी उपयुक्त आहे.
- ही आसनं केल्यानं पोटाचे स्नायू मजबूत होतात आणि पचनक्रियाही सुधारते. यामुळे बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्यांपासूनही आराम मिळतो.
- सूर्यनमस्कार केल्यानं मानसिक शांती मिळते. यामुळे तणाव आणि चिंता दूर करण्यात मदत होते. यामुळे एकाग्रता वाढते.
- सूर्यनमस्कारांमुळे रक्तदाबही नियंत्रणात राहतो.
- सूर्यनमस्कारांमुळे शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ताजंतवानंही वाटतं. या व्यायामामुळे शरीर दिवसभर ऊर्जावान राहतं.
-सूर्यनमस्कारांमुळे एकाग्रता वाढते आणि आत्मिक शांती मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.