Dry Eye Syndrome: ड्राय आय सिंड्रोम, डोळे कोरडे होत असतील तर वेळीच लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
डिजिटल स्क्रीनचा वाढता वापर, प्रदूषण आणि आहारात जंक आणि फास्ट फूडचं अतिसेवन यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांचं प्रमाण वाढतंय. मधुमेह, संधिवात, थायरॉईड आणि स्जोग्रेन्स सिंड्रोम सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये ड्राय आय सिंड्रोमचं प्रमाण अधिक आहे.
मुंबई: डिजिटल स्क्रीनचा वाढता वापर, प्रदूषण आणि जंक आणि फास्ट फूडचं अतिसेवन यामुळे डोळ्यांशी संबंधित अनेक समस्यांचं प्रमाण वाढतंय. मधुमेह, संधिवात, थायरॉईड आणि स्जोग्रेन्स सिंड्रोम सारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये ड्राय आय सिंड्रोमचं प्रमाण अधिक आहे.
ड्राय आय सिंड्रोम म्हणजे काय ?
ड्राय आय सिंड्रोम ही डोळ्यांशी संबंधित समस्या आहे. ज्यामध्ये डोळ्यांमध्ये कोरडेपणा जाणवतो. डोळ्यांमधून पुरेसे अश्रू येत नाहीत किंवा अश्रूंची गुणवत्ता इतकी खराब असते की ते लवकर वाळतात. अश्रूंमुळे आपल्या डोळ्यांना ओलावा, संरक्षण आणि स्पष्ट दृष्टी मिळते. अश्रू योग्य प्रमाणात तयार होत नाहीत, तेव्हा डोळे लाल, कोरडे आणि संवेदनशील होतात.
advertisement
ड्राय आय सिंड्रोमचा धोका कोणाला अधिक ?
ड्राय आय सिंड्रोम कोणालाही होऊ शकतो. परंतु ही समस्या काही लोकांमध्ये अधिक सामान्य आहे:
1. वृद्ध नागरिक - 50 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांना कमी अश्रू येतात. यामुळे, ही समस्या अधिक वेळा उद्भवते.
2. डिजिटल स्क्रीन अधिक वापरणाऱ्यांना ड्राय आय सिंड्रोमचा धोका अधिक आहे. कॉम्प्युटर, मोबाईल किंवा टीव्ही स्क्रीनवर जास्त वेळ पाहणाऱ्यांना हा त्रास जास्त होतो.
advertisement
3. हार्मोनल बदल, गर्भधारणा, रजोनिवृत्ती किंवा तोंडी गर्भनिरोधक घेत असलेल्या स्त्रियांमध्ये ड्राय आय सिंड्रोम  होण्याची शक्यता असते.
4. जास्त वेळ कॉन्टॅक्ट लेन्स वापरल्यानं डोळ्यातील ओलावा कमी होतो.
5. कोरड्या वातावरणामुळे जास्त धूळ, प्रदूषण किंवा हाय एसी असलेल्या वातावरणात राहणाऱ्यांना ड्राय आय सिंड्रोमचा धोका अधिक आहे.
advertisement
6. मधुमेह, संधिवात, थायरॉईड आणि स्जोग्रेन्स सिंड्रोम यासारख्या आजारांनी ग्रस्त असलेल्यांमध्ये ड्राय आय सिंड्रोमचा धोका अधिक आहे.
इतर काही कारणांमुळे ड्राय आय सिंड्रोमचा धोका वाढतो
* अश्रूंची निर्मिती कमी होणं.
* डोळे वारंवार चोळणं.
* अ जीवनसत्वाची कमतरता
* अँटी-हिस्टामाइन्स, नैराश्याची औषधं घेतली जात असतील तर हा धोका वाढतो.
advertisement
ड्राय आय सिंड्रोमचा धोका टाळण्यासाठी उपाय
1. डिजिटल स्क्रीनचा मर्यादित वापर करा. दर 20 मिनिटांनी, 20 सेकंदांसाठी ब्रेक घ्या आणि दूरवर पहा.
2. डोळे मिचकावण्याची सवय लावा - सतत डोळे ताठ ठेवल्यानं डोळ्यांवर ताण येतो त्यामुळे स्क्रीन पाहताना डोळे मिचकावण्याची सवय ठेवा यामुळे डोळे ओले राहतात.
4. संतुलित आहार घ्या - व्हिटॅमिन ए आणि ओमेगा -3 फॅटी अॅसिड्स असलेलं अन्न खा.
advertisement
5. डोळ्यांचं रक्षण करा,  धूळ आणि प्रदूषण टाळण्यासाठी गॉगलचा वापर करा.
6. डोळ्यांमध्ये आय ड्रॉप्स टाका. डोळे ओलसर ठेवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार आय ड्रॉप्स वापरा.
7. हवेचा योग्य प्रवाह राखणं. एसी किंवा हीटर असलेल्या खोल्यांमध्ये ह्युमिडिफायर वापरा.
8. सिगारेट आणि दारू टाळा, यामुळे डोळ्यातील ओलावा कमी होऊ शकतो.
9. पुरेशी झोप घ्या. डोळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी किमान 7-8 तासांची झोप आवश्यक आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 17, 2025 5:34 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Dry Eye Syndrome: ड्राय आय सिंड्रोम, डोळे कोरडे होत असतील तर वेळीच लक्ष द्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या


