व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सचा समावेश असणारे लिंबूपाणी आरोग्यासाठी चांगलं समजलं जातं. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, दररोज दोन ग्लास लिंबूपाणी पिणं योग्य आहे. तसंच एक लिटर पाण्यात जास्तीतजास्त लिंबाचे चार तुकडे मिसळणे योग्य आहे. अशा पद्धतीने तयार केलेलं लिंबूपाणी चांगलं हायड्रेशन प्रदान करते. या शिवाय तुम्ही कोमट लिंबूपाणी पिऊ शकता, व अतिरिक्त आरोग्य फायद्यांसाठी त्यामध्ये मध, पुदिन्याची पानं किंवा आलं घालू शकता. पण डॉक्टरांच्या मते, 'वय, आरोग्याची स्थिती आणि इतर परिस्थिती यासारख्या अनेक घटकांचा लिंबाच्या पाण्याच्या दैनंदिन सेवनावरदेखील परिणाम होतो.'
advertisement
(मुलांना लहान वयातच चष्मा लागलाय? हे 5 सुपर फूड्स द्या, नंबर लगेच होईल कमी)
त्यामुळेच जास्त प्रमाणात लिंबूपाण्याचं सेवन केल्याने त्याचे नेमके काय दुष्परिणाम होतात, हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आज आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर, लिंबू पाण्याचे अतिसेवन हे आरोग्यासाठी कसे हानिकारक आहे, ते जाणून घेऊ. ‘टाइम्स नाऊ’ने याबाबतची माहिती दिली आहे.
केसांसाठी हानिकारक
लिंबाच्या अतिसेवनामुळे केसांचं नुकसान होतं. यामुळे केसांची रंध्रं कोरडी होऊ शकतात, व केस गळतात.
दातांना कीड लागणं
अत्यंत आम्लयुक्त तसंच जास्त प्रमाणात लिंबाचा रस पिण्यात आल्यामुळे आपल्या दातांना मुंग्या येणं आणि दात कीडणं असे प्रकार घडू शकतात. डॉक्टरांच्या मते, 'दातांची झीज म्हणजे कॅल्सीफाईड केलेल्या दातांचं रासायनिक पदार्थांमुळे नुकसान होतं. म्हणूनच जर तुमचे दात संवेदनशीलतेने ग्रस्त असतील, तर तुम्ही लिंबासारख्या आम्लयुक्त पदार्थांचं सेवन मर्यादित केलं पाहिजे.
मायग्रेनला चालना
दररोज जास्त लिंबूपाणी प्यायल्याने तीव्र डोकेदुखी आणि मायग्रेन होतो. नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिनमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार (https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC4442763/ ), लिंबूवर्गीय फळांमध्ये टायरामाइनचे प्रमाण हे व्हिटॅमिन सीमुळे जास्त असते.
डिहायड्रेशनची समस्या
आरोग्यतज्ज्ञांच्या मते, लिंबाचा रस हा शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचा एक उत्तम मार्ग आहे. हा लघवीचं प्रमाण वाढवणारा पदार्थ आहे, आणि यामुळे मूत्रपिंडात अधिक मूत्र उत्पादन होऊ शकतं. त्यामुळे पाण्याबरोबरच वारंवार लघवी केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स बाहेर पडतात, ज्यामुळे डिहायड्रेशन, थकवा, ओठ कोरडे पडणं आणि जास्त तहान लागणं,अशा समस्या उद्भवतात.
('हे' तीन ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने वाढेल स्पर्म काउंट, नपुंसकता होईल दूर)
पचन समस्या
दररोज रिकाम्या पोटी लिंबूपाणी मधासह प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. मात्र, दिवसभर ते प्यायल्याने पोटाच्या अस्तरास त्रास होऊ शकतो, आणि पचन प्रक्रिया कमी होते. यामुळे छातीत जळजळ, पोटदुखी, मळमळ आणि अगदी पोट फुगणे देखील होऊ शकते. डॉक्टरांच्या मते, 'उच्च अॅसिडिटीमुळे लिंबू पाणी देखील अल्सरला कारणीभूत ठरू शकतं. लिंबाची आम्लीय सामग्री पोट आणि आतड्याच्या आतील अस्तरास हानी पोहोचवू शकते, ज्यामुळे अल्सर होतो.'
अल्सरची समस्या
ज्या व्यक्ती आम्लयुक्त किंवा मसालेदार अन्न जास्त खातात, किंवा ज्यांच्यात व्हिटॅमिनची कमतरता असते, त्यांना अल्सरची शक्यता असते. तसेच अमेरिकन डेंटल असोसिएशनच्या मते, जास्त प्रमाणात लिंबूपाणी पिण्यामुळे विद्यमान कॅन्कर फोड देखील होऊ शकतात. तोंडात येणाऱ्या या फोडांमुळे खाणं आणि बोलणं अवघड होऊ शकतं. उन्हाळ्यात लिंबूपाणी ताजेतवानं ठेवतं. व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्सने भरलेला, लिंबाचा रस गरम आणि उष्ण दिवसांमध्ये खूपच दिलासा देतो. तापमान वाढू लागल्याने लिंबूपाण्याला मोठी मागणी असते. पण लिंबूपाणीही योग्य प्रमाणातच प्यायला हवं म्हणजे ते फायद्याचं ठरतं.
