Male Fertility : 'हे' तीन ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने वाढेल स्पर्म काउंट, नपुंसकता होईल दूर
- Published by:Pooja Pawar
Last Updated:
रोजच्या आहारात 3 प्रकारच्या ड्रायफ्रुटसचा समावेश केल्यास पुरुषांची प्रजनन क्षमता आणि स्टॅमिना सुधारतो.
लग्नानंतर पुरुष सुखी आयुष्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत असतात. परंतु जर शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता चांगली नसेल पुरुषांच्या प्रजनन क्षमतेवर खूप वाईट परिणाम होतो. यामुळे अशी समस्या असलेल्या पुरुषांना वडील होण्यात अडचणी येऊ शकतात. ही बाब इतकी वैयक्तिक असते की अनेक पुरुष लज्जेमुळे कोणाशीही यागोष्टी शेअर करत नाहीत. परंतु स्पर्म काउंट आणि गुणवत्ता वाढवण्यासाठी ड्रायफ्रूट्स उपयोगी ठरू शकतात.
चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी इत्यादी पुरुषांच्या या अंतर्गत समस्यांना मोठ्या प्रमाणात कारणीभूत असतात. तेव्हा वेळीच जर या चूका सुधारल्या तर लैंगिक दुर्बलता, शुक्राणूंची कमतरता, पुरुष वंध्यत्व यासारख्या समस्या काही आठवड्यांतच दूर होऊ शकतात. रोजच्या आहारात 3 प्रकारच्या ड्रायफ्रुटसचा समावेश केल्यास पुरुषांची प्रजनन क्षमता आणि स्टॅमिना सुधारतो.
द्राक्षे वाळवून मनुके तयार केले जातात, ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर आणि पौष्टिकतेने परिपूर्ण आहेत. सूर्यप्रकाशामुळे या ड्रायफ्रूटमध्ये इलेक्ट्रोलाइट्स, अँटिऑक्सिडंट्स, खनिजे, ऊर्जा आणि जीवनसत्त्वे एकाग्र होतात. मनुका व्हिटॅमिन ए पासून समृद्ध आहे, जे केवळ शुक्राणूंची संख्या आणि शुक्राणूंची गुणवत्ता सुधारत नाही तर शुक्राणूंची गतिशीलता देखील वाढवते. परंतू, मधुमेहाच्या रुग्णांनी याचे मर्यादित प्रमाणात सेवन करावे.
advertisement
खजूर : अनेक संशोधनांनुसार खजुरांमुळे पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता वाढते. तसेच खजुराच्या सेवनाने पुरुषांची लैंगिक इच्छा आणि स्टॅमीना सुधारतो.
अंजीर : अंजीर खाल्ल्याने पुरुषांची प्रजनन क्षमता सुधारते आणि त्यांच्या शुक्राणूंची संख्या देखील वाढते. अंजीर हे जीवनसत्त्वे, खनिजे इत्यादींनी समृद्ध असून त्यात फायबर , व्हिटॅमिन बी 6 सारखे देखील घटक आहेत.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 04, 2023 4:04 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Male Fertility : 'हे' तीन ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने वाढेल स्पर्म काउंट, नपुंसकता होईल दूर


