Kitchen Tips : पावसाळ्यात मीठ, साखरेला पाणी सुटलय? 4 टिप्सने ओलावा होईल दूर

Last Updated:
पावसाळा सुरु झाल्याने वातावरण दमट होऊन अनेक खाद्यपदार्थ खराब होऊ लागतात. पावसाळ्यात पदार्थ खराब होऊ नयेत म्हणून महिला उन्हाळ्यात पदार्थ वाळवून ठेवतात, परंतु काही असे पदार्थ आहेत जे वाळवता येत नाहीत. पावसाळ्यात अधिकतर किचनमधील मीठ आणि साखरेला पाणी सुटतं आणि त्यात ओलावा तयार होतो. तेव्हा अशावेळी हे पदार्थ खराब होऊ नये आणि त्यातील ओलावा निघून जावा यासाठी काही सोप्या टिप्स फॉलो करा.
1/5
अनेकदा पावसाळ्यात साखर आणि मिठाला ओलसरपणा येतो. त्यामुळे त्यांचे गट्ठे होतात आणि स्वयंपाकात वापरताना काहीशी अडचण होते. तेव्हा सोप्या टिप्स वापरून तुम्ही यातील ओलसरपणा दूर करू शकता.

advertisement
2/5
पावसाळ्यामध्ये साखरेला आणि मिठाला ओलसरपणा येऊ नये म्हणून साखरेमध्ये सात-आठ लवंग टाकून ठेवा. यामुळे त्याला ओलसरपणा सोबतच मुंग्या देखील येणार नाहीत.

3/5
साखरेला ओलसरपणा येऊ नये यासाठी साखरेच्या डब्यामध्ये तांदळाचे काही दाणे टाका. साखरेत किंवा मिठामध्ये तांदळाची पुरचूंडी टाकून त्यामध्ये ठेवून द्या. यामुळे त्यामध्ये तयार झालेला ओलावा शोषला जाईल आणि साखर किंवा मिठामध्ये ओलावा राहाणार नाही.

4/5
ब्लोटिंग पेपर ओलावा खेचून घेण्यासाठी मदत करतो. त्यामुळे बरणीमध्ये मीठ किंवा साखर भरण्यापूर्वी त्यात ब्लोटिंग पेपर घाला. एवढंच नाही तर बिस्कीट, कुकीज आणि चिप्स मऊ पडू नयेत म्हणून देखील तुम्ही ब्लोटिंग पेपरचा वापर करू शकता.

5/5
पावसाळ्यात साखर आणि मीठ हे प्लास्टिकच्या बरण्यांमध्ये न ठेवता काचेच्या बरण्यांमध्ये ठेवा. याशिवाय साखर किंवा मीठ काढत असताना नेहमी सुक्या हाताने काढा. ओल्या हाताने पदार्थ काढताना तो ओलावा जर पदार्थाला लागला तर ती ओली होते.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement