दिल्ली: आई-वडील बनण्याचा अनुभव हा प्रत्येकासाठी खासच असतो. मात्र या प्रवासात अनेक वेगवेगळ्या आव्हानांना सामोरं जावं लागतं. बाळ जन्मल्यानंतर पहिल्यांदाच आजारी पडतं, तेव्हा पालकांचा ताण आणि जबाबदारी दोन्ही वाढलेली असते. तापाने त्रासलेल्या मुलाला पाहणं कोणत्याही आई-वडिलांसाठी सोपं नाही. पण आता तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण दिल्लीतील बालरोग तज्ज्ञांनी अशावेळी काय काळजी घ्यावी? याबाबत सविस्तर सांगितलंय.
advertisement
दक्षिण दिल्लीतील NFC मध्ये माता मंदिर धर्मादाय रुग्णालय असून दिल्लीतील नावाजलेल्या रुग्णालयांत याचा समावेश होतो. या रुग्णालयाच्या बालरोग तज्ज्ञ डॉ. वीणा दुआ या आहेत. त्यांनी मेरठच्या एलएलआरएम मेडिकल कॉलेजमधून ग्रॅज्युएशन पूर्ण केले. त्यानंतर कलावती हॉस्पिटल, लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथून पोस्ट ग्रॅज्युएशन केलं. गेल्या 45 वर्षांपासून त्या लहान मुलांवर उपचार करत आहेत. "नवजात बाळाला पहिल्यांदा ताप आल्यास पालकांनी घाबरू नये. कारण मुलामध्ये ताप ही एक सामान्य समस्या आहे. फक्त या टिप्स लक्षात ठेवून त्यांची काळजी घ्या," असं डॉ. दुआ सांगतात.
अॅसिडिटी अन् चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, पाहा जांभूळ खाण्याचे शरीरासाठी फायदे
योग्य थर्मामीटर निवडा
बाळाचा ताप मोजण्यासाठी, बाळाच्या शरीरावर एक मिनिट थर्मामीटर ठेवा. जर मुलाच्या शरीराचे तापमान 100 च्या वर गेले तर त्याचा अर्थ मुलाला ताप आहे असा होतो. जर ताप 100.5 किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर मुलाला औषध द्यावे आणि जर एक दिवस औषध घेऊनही ताप कमी होत नसेल तर बाळाला त्वरित बालरोग तज्ज्ञांना दाखवले पाहिजे.
बाळाला थंड ठिकाणी ठेवा
बऱ्याचदा खूप उकाडा असतो आणि अशा परिस्थितीत काही लोकांच्या घरात कूलर किंवा एसी नसतो. त्यामुळे मुलांना ताप येतो. तेव्हा मुलांना ताप येऊ नये म्हणून बाळाला थंड वाटेल अशा ठिकाणी ठेवण्याचा सल्ला डॉक्टर देतात.
मीठ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास काय होतं? खूप आश्चर्यजनक आहेत फायदे
घरगुती उपाय नकोच
तुमच्या मुलाला ताप असल्यास घरगुती उपाय करू नका. त्यापेक्षा लवकरात लवकर एखाद्या चांगल्या चाइल्ड स्पेशालिस्टला दाखवा आणि ताप असताना बाळाला पाणी देत राहा. अन्यथा बाळाला डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते, असेही डॉक्टरांनी सांगितले.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरी आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.