अ‍ॅसिडिटी अन् चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, पाहा जांभूळ खाण्याचे शरीरासाठी फायदे

Last Updated:

सध्या बाजारामध्ये जांभूळ हे फळ दाखल झाले आहे. जांभळाचा निळसर जांभळट रंग सगळ्यांनाच आकर्षित करतो. याचबरोबर या फळाचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.

+
सध्या

सध्या बाजारामध्ये जांभूळ हे फळ दाखल झाले आहे. जांभळाचा निळसर जांभळट रंग सगळ्यांनाच आकर्षित करतो. याचबरोबर या फळाचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत.

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या समस्या या अधिक प्रमाणात वाढत आहेत. त्यामुळे हल्ली प्रत्येक जण आपल्या आरोग्याच्या बाबतीत अतिशय सजग झाला आहे. आपले आरोग्य सदृढ आणि उत्तम राखण्यासाठी हंगामी फळांचे सेवन हे अतिशय आवश्यक असतं. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती तर वाढतेच, त्याचबरोबर त्या त्या हंगामात येणाऱ्या फळांचा आस्वाद देखील आपल्याला घेता येतो. सध्या बाजारामध्ये जांभूळ हे फळ दाखल झाले आहे. जांभळाचा निळसर जांभळट रंग सगळ्यांनाच आकर्षित करतो. याचबरोबर या फळाचे आरोग्यदायी अनेक फायदे आहेत. हे आरोग्यदायी फायदे कोणते? याबद्दच आपल्याला जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे माहिती दिली आहे.
advertisement
जांभळाचे आरोग्यदायी फायदे कोणते?
जांभूळ हे अतिशय बहुगुणी फळ आहे. क जीवनसत्वाने भरपूर असल्याने थकवा येत असेल, हिरड्यांवर सूज येत असेल यासाठी जांभूळ अतिशय उपयुक्त आहे. डायबिटीस रुग्णांसाठी तर जांभूळ हे एक प्रकारे वरदानच आहे. यामुळे मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी जांभळाचे नियमित सेवन करावे. याचबरोबर जांभळाच्या बियांची पेस्ट, जांभळाची साल, जांभळाच्या झाडाची पाने ही देखील अतिशय उपयुक्त असतात, असं आहार तज्ज्ञ गीता कोल्हे सांगतात.
advertisement
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
जांभूळ बियांची पेस्ट करून मधुमेही रुग्णांनी दररोज त्याचा आहारात समावेश केल्यास खूप फायदे मिळतात. तसेच मुतखड्याचा त्रास असलेल्या रुग्णांनी देखील जांभूळ बियांच्या पेस्टचा आपल्या आहारात समावेश करावा. जांभूळमध्ये एंटीऑक्सीडेंट असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते. याचबरोबर आपली पचनक्रिया सुधारते. जांभूळ गुणांनी थंड असल्याने शरीरातील दाह कमी करतं. यामुळे ज्यांना अ‍ॅसिडिटी अपचन बद्धकोष्ठता असे त्रास आहे त्यांनी आवर्जून जांभूळ फळाचे सेवन करावं. जांभूळ त्वचेसाठी देखील अतिशय उपयुक्त असून जांभळाच्या सेवनाने आणि त्या डिटॉक्स होऊन त्वचेवर ग्लो येतो. चेहऱ्यावर पिंपल्स असतील तर ते नाहीसे होण्यास देखील जांभळाचा उपयोग होतो, असं आहार तज्ज्ञ गीता कोल्हे सांगतात.
advertisement
किती प्रमाणात जांभूळ खाणे योग्य 
जांभूळ आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असले तरी त्याचे सेवन हे एका विशिष्ट मर्यादितच केले पाहिजे. दहा ते बारा जांभळांच सेवन दररोज करण्यास हरकत नाही. तर मधुमेह असलेल्या व्यक्तींनी 15 ते 20 जांभूळ फळांची सेवन करावे तर वृद्ध किंवा लहान मुलांनी पाच ते सहाच जांभूळ फळे खावीत.
advertisement
जास्त प्रमाणात खाल्ल्यास काय होईल 
जांभूळ गुणांनी थंड असल्याने जास्त प्रमाणात सेवन केल्यास उलट्यांचा त्रास होऊ शकतो. याचबरोबर जुलाब, शरीरावर गाठी येणे, यासारखी दुष्परिणाम देखील उद्भवू शकतात. अशाप्रकारे जांभूळ हे फळ गुणांनी अतिशय उपयुक्त असून त्याचे दररोज नियमित सेवन केल्यास आपल्या आरोग्यास भरपूर फायदे मिळतात. त्यामुळे या बहुगुणी फळाचे सेवन प्रत्येकाने करावं, असं आवाहन गीता कोल्हे यांनी केले आहे.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
अ‍ॅसिडिटी अन् चेहऱ्यावरील पिंपल्स होतील दूर, पाहा जांभूळ खाण्याचे शरीरासाठी फायदे
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement