वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी बरेच पर्याय वापरुन झाले असतील तर या पाचपैकी एखादा पर्याय राहिला नाही ना ते तपासून पाहा. कारण अधिकचे पैसे खर्च न करता, हे पर्याय वापरले तर तुमचं शरीर योग्य आकारात राहिल आणि एका आठवड्यात तुमच्या शरीरात फरक दिसेल.
प्रथिनं
advertisement
तुमच्या आहारात प्रथिनांचं प्रमाण किती आहे ते तपासून घ्या. यासाठी चिकन, चीज, मसूर आणि अंडी खाण्यावर भर द्या. कारण प्रथिनं स्नायू तयार करण्यात मदत करतात आणि यामुळे पोट दीर्घकाळ भरलेलं राहतं, आणि अतिरिक्त आणि अति खाण्यापासून तुम्ही परावृत्त राहता.
Face Cream : चेहऱ्यासाठी बनवा खास क्रिम, फेस क्रिममुळे राहिल त्वचा मुलायम
पुरेसं पाणी प्या
वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी पाणी किती पिता हे खूप महत्त्वाचं आहे. दररोज किमान 3 ते 4 लिटर पाणी प्या. यामुळे तुमचं शरीर हायड्रेटेड राहतं आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जात नाही. जेवणापूर्वी 1 तास आधी पाणी प्या, यामुळे तुमचं वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
नाश्ता
दिवसाची सुरुवात नाश्त्यानं होते, त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात पोषक तत्वांचा समावेश करा. ओट्स, फळं, दही, मूग डाळ, अंडी यासारख्या प्रथिनयुक्त गोष्टींचा समावेश करा. यामुळे तुम्हाला फ्रेश वाटतं आणि गरजेपेक्षा जास्त खाल्लं जात नाही.
Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त
जंक फूडपासून दूर राहा
फिट राहण्यासाठी, वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी, खाण्यापिण्याच्या सवयींवर खूप नियंत्रण ठेवावं लागेल. आहारात जंक फूड, चिप्स, बर्गर आणि गोड पदार्थ टाळा. फळं, सॅलड, सुका मेवा खा.
व्यायाम करा
फिट राहण्यासाठी शिस्तबद्ध असणं खूप गरजेचं आहे. वजन नियंत्रित करण्यासाठी दिवसाची सुरुवात व्यायामानं करा. जिम, योगा आणि प्राणायाम करा. या सगळ्या सवयींमुळे तुमचं वजन 1 आठवड्यात नियंत्रणात येण्यास सुरुवात होईल.