Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त

Last Updated:

रोज एक डाळिंब खाणं तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.

News18
News18
मुंबई : हंगामी फळं, भाज्या खाण्याचं महत्त्व आपण कायम ऐकून असतो. यातलंच एक फळ म्हणजे डाळिंब. फळं खाणं आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानलं जातं, रोज एक डाळिंब खाणं तुमच्या आरोग्यासाठी वरदान आहे. दररोज एक डाळिंब खाल्ल्यानं शरीरातील अशक्तपणा दूर होण्यास मदत होते.
'An Apple a day keeps doctor away' ही म्हण तुम्ही ऐकली असेल. त्याचप्रमाणे, रोज एक डाळिंब खाल्ल्यानं आरोग्याला अनेक लाभ होतात. तुमच्या शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असेल तर रोज एक डाळिंब खाणं तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतं. त्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते.
advertisement
  • डाळिंबात व्हिटॅमिन सी देखील आढळतं, ज्यामुळे शरीरात लोहाचं शोषण वाढण्यास मदत होते.
  • शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते.
  • हृदयाच्या आरोग्यासाठीही हे खूप फायदेशीर आहे.
  • डाळिंबात दाहक-विरोधी गुणधर्म आढळतात, ज्यामुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.
  • रोज एक डाळिंब खाल्ल्यानं वजन कमी होण्यास मदत होते. यामध्ये असलेल्या फायबरमुळे शरीरात जमा झालेली चरबी कमी होण्यास मदत होते.
advertisement
  • डाळिंबात आढळणारे घटक पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे पोट व्यवस्थित साफ होण्यास मदत होते.
  • रोज एक डाळिंब खाल्ल्यानं रक्तदाब नियंत्रित राहतो. बीपी म्हणजेच रक्तदाब सतत वाढत असेल तर रोज एका डाळिंबाचा आहारात समावेश करा.
  • डाळिंबातल्या विविध गुणधर्मांमुळे त्वचा निरोगी राहण्यास मदत होते.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Pomegranate : आरोग्यासाठी उपयुक्त फळ - डाळिंब, अशक्तपणा होईल दूर, तब्येत राहिल तंदुरुस्त
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement