TRENDING:

मीठ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास काय होतं? खूप आश्चर्यजनक आहेत फायदे

Last Updated:

मिठात सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. ही आंघोळ अतिशय फायद्याची ठरते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
आजारांशी लढण्याची ताकद शरिराला मिळते.
आजारांशी लढण्याची ताकद शरिराला मिळते.
advertisement

नवी दिल्ली : अनेकजण आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळतात. प्राचीन काळापासून हा उपाय केला जातो. असं म्हणतात की, यामुळे आरोग्य सुदृढ राहतं, पण यामुळे नेमकं काय होतं हे आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

मिठात सोडियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असतं, ज्याचा आरोग्याला फायदा होतो. आंघोळीच्या पाण्यात मीठ मिसळल्यानं ते त्वचेसह केसांसाठीही फायदेशीर असतं. मिठामुळे त्वचेवरचे डाग हळूहळू कमी होतात. शिवाय त्वचा तजेलदार दिसते आणि छान मऊ होते.

advertisement

हेही वाचा : कोण म्हणतं वजन लगेच कमी होत नाही? 'हा' 1 उपाय करा आणि स्वत: फरक बघा

जर आपल्याला सांधेदुखीचा त्रास असेल तर तोसुद्धा मीठ घातलेल्या पाण्याने अंघोळ केल्यास कमी होतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पाण्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती उत्तम होते. त्यामुळे आजारांशी लढण्याची ताकद शरिराला मिळते. तसंच मिठामुळे विषाणूही आपल्यापासून दूर राहतात.

advertisement

दरम्यान, आजकाल वजनवाढीची समस्या सामान्य झाली आहे. अशावेळी मीठ घातलेल्या पाण्याने आंघोळ करणं अतिशय फायदेशीर ठरतं. दररोज काळं मीठ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास हळूहळू वजन कमी होण्यास मदत मिळते.

सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांशी चर्चा करावी. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
मीठ मिसळलेल्या पाण्याने आंघोळ केल्यास काय होतं? खूप आश्चर्यजनक आहेत फायदे
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल