कोण म्हणतं वजन लगेच कमी होत नाही? 'हा' 1 उपाय करा आणि स्वत: फरक बघा
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनाबाबत चिंतेत असाल, तर यावर डॉक्टर मीरा बत्रा यांनी एक रामबाण उपाय सांगितलाय.
रिया पांडे, प्रतिनिधी
नवी दिल्ली : आजकाल अनेकजणांचं काम एकाजागी बसूनच असतं. शिवाय मोबाईलच्या अतिवापरामुळे शरिराची हालचाल होतच नाही. बहुतेकदा घरातली कामंसुद्धा स्वतः केली जात नाहीत. त्यामुळे वाढलेलं वजन कमी करणं हे आजकाल अनेकजणांसमोर मोठं चॅलेंज असतं. त्यात व्यायाम करूनसुद्धा किलोभरही वजन कमी होत नाही आणि खाण्यावर कंट्रोल ठेवता येत नाही. अशी स्थिती तुमचीही असेल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे.
advertisement
तुम्ही तुमच्या वाढलेल्या वजनाबाबत चिंतेत असाल, तर यावर डॉक्टर मीरा बत्रा यांनी एक रामबाण उपाय सांगितलाय. फिट राहण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं ते हेल्थी डायट. घरचे पौष्टिक पदार्थ खाल्ल्याने वजन नियंत्रणात राहू शकतं. शिवाय आळशीच्या बिया वजन कमी करण्यासाठी अत्यंत गुणकारी ठरतात.
advertisement
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, या बियांमध्ये प्रोटीन, आयर्न, कॅल्शियम, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन बी, कॉम्प्लेक्स, झिंक, फायबर, कॉपर, सेलेनियम, कॅरोटीन, पोटॅशियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम आणि मॅगनीज भरपूर प्रमाणात असतं. त्यामुळे आळशी अँटी-बॅक्टेरियल, अँटी-फंगल आणि अँटी-व्हायरल असते. ज्याचा शरिराला भरपूर फायदा होतो. यामुळे आरोग्य सुदृढ राहतंच, शिवाय वजन कमी होण्यासही मदत मिळते.
advertisement
डॉक्टरांनी सांगितलं की, वजन कमी करण्यासाठी आळशीच्या बियांची पावडर बनवून तिचं सेवन करावं. सकाळी उपाशीपोटी गरम पाण्यात ही पावडर मिसळून प्यावी. जर तिची चव आवडत नसेल तर किंचित मधाचा वापरही करू शकता. यामुळे वजन कमी होईलच शिवाय पचनसंस्थाही उत्तम राहील.
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.
Location :
New Delhi,Delhi
First Published :
June 15, 2024 5:46 PM IST