फेशियल ग्लो काहीच दिवसात जातो? त्यापेक्षा घरी मिळवा नॅचरल Glow, नेहमी राहा Ready
- Published by:Isha Jagtap
- local18
Last Updated:
उन्हामुळे आपल्या त्वचेवर मळाचा एक नाजूक थर तयार होतो, ज्यामुळे चेहरा निस्तेज दिसू लागतो. वेगवेगळ्या महागड्या क्रीम्स वापरूनही आपला नॅचरल ग्लो काही परत येत नाही. अशावेळी आपण पार्लरमध्ये जाऊन शेकडो रुपये खर्च करून फेशियल करतो. ज्याची चमकही काहीच दिवस टिकते. त्यामुळे आज आपण नॅचरल ग्लोसाठी घरच्या घरी फेशियल कसं करावं हे जाणून घेणार आहोत. ज्यामुळे प्रत्येक कार्यक्रमाआधी तुम्हाला पार्लरमध्ये जायची गरज भासणार नाही. तर, चेहऱ्यावर कायम तेज असल्यानं तुम्ही कोणत्याही कार्यक्रमासाठी कधीही तयार असाल. (रिया पांडे, प्रतिनिधी)
कडूलिंबाची पानं औषधी गुणांनी परिपूर्ण असतात. आरोग्यासह त्वचेसाठीसुद्धा ही पानं अतिशय फायदेशीर मानली जातात. त्यामुळे ती पाण्यात उकळवून सूती कापडात गुंडाळून गाळून घ्या, निघालेल्या रसात कोरफडाचा गर मिसळून फ्रिजमध्ये ठेवा. या मिश्रणाचे बर्फाचे तुकडे तयार झाले की, त्यांनी चेहऱ्याला 15 मिनिटं मसाज करा. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स आणि टॅनिंग दोन्ही हळूहळू मुळापासून नष्ट होतील.
advertisement
advertisement
advertisement
गुलाबाची पानंसुद्धा चेहऱ्यावर गुलाबी ग्लो आणू शकतात. त्यासाठी गुलाबाची अनेक पानं गोळा करून पाण्यात उकळा. हे पाणी गाळून त्याचे बर्फाचे गोळे तयार करा. झोपण्यापूर्वी या गोळ्यांनी चेहऱ्यावर मसाज केल्यास तुमचा चेहरा लगेच तजेलदार दिसू लागेल.
advertisement
सूचना : इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. तरीही आपण आपल्या आरोग्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी स्वतः डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणत्याही नुकसानासाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.