कमी मिठाचा आहार घ्या : उच्च रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी मिठाचे प्रमाण कमी ठेवा. दररोज केवळ 5 ग्रॅम मीठ घ्यावे. जास्त सोडियमयुक्त पदार्थ टाळा. फळे आणि हिरव्या पालेभाज्यांचे सेवन वाढवा. यात पोटॅशियम आणि फायबर मुबलक असते, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. जास्त चरबीयुक्त व साखरयुक्त पदार्थ टाळा, कारण यामुळे वजन वाढते. वजन वाढल्याने उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
advertisement
नियमित व्यायाम करा : रोज किमान 30 मिनिटे व्यायाम करा. आठवड्यातून पाच दिवस लांब चालणे, योगा, पोहणे यासारख्या हृदयासाठी फायदेशीर व्यायाम प्रकारांचा समावेश करा.
पुरेशी झोप घ्या : रात्रभर 7-8 तास शांत झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. झोपण्यापूर्वी कॉफी, दारू आणि साखरयुक्त पदार्थ टाळा.
ताणतणावावर नियंत्रण ठेवा : ताणतणाव कमी ठेवणे ही उच्च रक्तदाब नियंत्रणासाठी महत्त्वाची गोष्ट आहे. ध्यान, प्राणायाम यांचा सराव करून ताण कमी करा. ताणाचे मूळ कारण ओळखा आणि त्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.
धूम्रपान आणि मद्यपान टाळा : धूम्रपान व मद्यपानामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. यासाठी त्वरित धूम्रपान आणि मद्यपान सोडा. याशिवाय नियमित आरोग्य तपासणी करा. घरात रक्तदाब मोजण्याचे यंत्र ठेवा आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित तपासणी करा.
औषधांचे सेवन नियमित ठेवा : डॉक्टरांनी दिलेली औषधे नियमित घ्या. औषधे स्वतःहून बंद करू नका. डॉ. मेधी यांचा सल्ला आहे की, उच्च रक्तदाबाचा धोका कमी करण्यासाठी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि जागरूक राहा.
हे ही वाचा : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांची तब्येत बिघडली, अपोलो रुग्णालयात दाखल
हे ही वाचा : CM Eknath Shinde name plate : CM शिंदेंच्या नावाची पाटी काढली, पुन्हा लावली, नेमकं काय घडलं?