TRENDING:

Fatty Liver : यकृताची काळजी घ्या, लिव्हर फॅटी होऊ नये यासाठी खास टिप्स

Last Updated:

यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. या साचलेल्या चरबीमुळे यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात. योग्य आहारामुळे यकृताचं आरोग्य जपता येतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : यंदा मे महिन्यातच पाऊस सुरु झालाय. अचानक झालेल्या वातावरणातल्या बदलानं प्रकृतीवर परिणाम होऊ शकतो. त्यातच सुट्ट्या, बाहेर फिरणं यामुळे बरेचसे चमचमीत, तेलकट पदार्थ खाल्ले जातात. पण अशा खाण्याच्या नादात, शरीराकडे दुर्लक्ष होतं आणि त्याचे परिणाम दिसायला लागतात.
News18
News18
advertisement

फॅटी लिव्हर ...हल्ली सर्रास ऐकायला मिळणारा शब्द...फॅटी लिव्हरमुळे होणारे त्रासही आपण ऐकतो. यकृतामध्ये चरबी जमा होऊ लागते तेव्हा फॅटी लिव्हरची समस्या उद्भवते. या साचलेल्या चरबीमुळे यकृताशी संबंधित समस्या निर्माण होतात.

आहाराकडे लक्ष न देणं हे फॅटी लिव्हरचं सर्वात मोठं कारण आहे. जास्त प्रमाणात मद्यपान केल्यानं यकृताचं नुकसान होऊ लागतं. याशिवाय, लठ्ठपणा, टाइप 2 मधुमेह आणि उच्च रक्तदाब यामुळेही फॅटी लिव्हरचा त्रास जाणवू शकतो. फॅटी लिव्हरची समस्या कमी करण्यासाठी खाण्याच्या सवयी सुधारणं खूप महत्वाचं आहे. योग्य आहार आणि जीवनशैली यामुळे यकृतातील चरबी निघण्यासाठी मदत होते.

advertisement

फॅटी लिव्हर ही समस्या जाणवत असेल तर कोणते पदार्थ खाणं फायदेशीर आहे याविषयी पोषणतज्ज्ञांचं मत महत्त्वाचं आहे. पोषणतज्ज्ञ आशिमा अचंतानी यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे. कोणत्या पदार्थांमुळे फॅटी लिव्हर स्वच्छ होतं आणि डिटॉक्स करण्यासाठी मदत होते याविषयीची माहिती या व्हिडिओत देण्यात आली आहे.

Coronavirus in India : कोव्हिड लस घेतली तरी कोरोनोचा धोका आहे का?

advertisement

हळद

फॅटी लिव्हरच्या समस्येवर हळद फायदेशीर आहे. एक ग्लास पाण्यात किंवा दुधात हळद आणि थोडी काळी मिरी घाला आणि मिक्स करा. ते आठवडाभर सतत प्या, नंतर दोन आठवड्यांनंतर पुन्हा आठवडाभर सतत प्या.

यकृत डिटॉक्स करण्यासाठी हळद फायदेशीर ठरते.

लसूण

लसूण किसून घ्या आणि पाण्यासोबत घ्या किंवा इतर अन्नपदार्थांमध्ये घालून खा. यकृतामध्ये जमा झालेली चरबी काढून टाकण्यासाठी लसूण प्रभावी उपाय आहे. लसूण खाल्ल्यानं यकृत डिटॉक्स होण्याबरोबरच उच्च कोलेस्ट्रॉल असलेल्यांनाही कच्चा लसूण खाल्ल्यानं फायदा होतो.

advertisement

लिंबू

दररोज एक लिंबाचा रस प्यायला तर यकृत डिटॉक्स होण्यासाठी मदत होते. जेवताना, वाढलेल्या अन्नपदार्थांवर लिंबू पिळल्यानं यकृत स्वच्छ करण्यास मदत होते.

बाईकला 'मायलेज' मिळत नाहीये? तर फाॅलो करा 'या' सिक्रेट टिप्स; जुनी बाईकही देईल धमाकेदार मायलेज! 

टोमॅटो

टोमॅटोमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. नुसता कच्चा टोमॅटो खाणं, किंवा टोमॅटो सॅलड बनवून खाऊ शकता.

advertisement

ओट्स

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Krishi Market: कांद्यानं रडवलं, रविवारी मका अन् सोयाबीनला किती मिळाला भाव?
सर्व पहा

ओट्समध्ये भरपूर फायबर असतं. पोटाच्या समस्या दूर करण्यासाठी फायबर विशेषतः फायदेशीर आहे. फॅटी लिव्हरच्या समस्या कमी करण्यासाठी, यकृताचं आरोग्य सुधारण्यासाठी याचा उपयोग होतो. ओट्स तुम्हाला आवडेल त्या पद्धतीनं खाऊ शकता.  ओट्स बारीक केल्यानंतर, त्याच्या पिठापासून चपाती किंवा पोळी किंवा धीरडं बनवता येतं.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Fatty Liver : यकृताची काळजी घ्या, लिव्हर फॅटी होऊ नये यासाठी खास टिप्स
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल