लवंगा वापरल्यानं तुमची यापासून सुटका होऊ शकेल. उन्हाळा सुरू झालाय, डासांची संख्याही वाढू लागली आहे. या डासांपासून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करुन बघू शकता. डासांमुळे रात्री झोपणं कठीण होऊन जातं. त्यामुळे लवंग, कांदा आणि कापूर वापरुन तुम्ही उपाय करु शकता.
लवंग, कांदा आणि कापूर
हा घरगुती उपाय करण्यासाठी 4 ते 5 लवंगा, एक कांदा, कापूर आणि मोहरीचं तेल घ्या. सर्व प्रथम, कांदा घ्या, त्याचा वरचा भाग कापून घ्या आणि त्यावर चाकूनं एक छिद्र करा ज्यामध्ये तेल भरता येईल. त्यात मोहरीचं तेल, कापूर आणि लवंगा घाला. आता कापसाची वात तयार करुन ती या तेलात बुडवून पेटवून ठेवा. या घरगुती उपायानं डास दूर होतील. या दिव्यातून निघणारा धूर डासांना दूर करण्यासाठी प्रभावी ठरतो.
advertisement
Bottle Gourd : आरोग्यकारक दुधी भोपळा - त्वचेपासून हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त
लसूण
डासांपासून दूर राहण्यासाठीही लसणाचा वापर केला जाऊ शकतो. ही रेसिपी वापरण्यासाठी, लसूण ठेचून एक कप पाण्यात घाला. यासाठी तुम्ही 10 ते 12 लसूण पाकळ्या घेऊ शकता. हे द्रावण स्प्रे बाटलीत भरुन डासांवर शिंपडा. लसणाचा वास असह्य झाल्यानं डास दूर होतील.
लिंबू आणि लवंग
डासांपासून मुक्त ठेवण्यासाठी अर्ध लिंबू घ्या आणि त्यात 7 ते 8 लवंगा खोचून खोलीत ठेवा. लिंबू आणि लवंगाचा वास डासांना खोलीत येण्यापासून रोखेल. लवंगातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म आरोग्यासाठी हानिकारक नाहीत. त्यामुळे लिंबू खोलीत ठेवता येईल.
Face Mask : सुरकुत्या कमी करण्यासाठी सोपा उपाय, त्वचा दीर्घकाळ राहिल तरुण
- डास चावलेला भाग दुखत होत असेल आणि या खुणा मुरुमांसारख्या दिसत असतील तर त्यावर मध लावू शकता. मधामधले गुणधर्मामुळे जखम वेगानं बरी होते.
- डास चावलेल्या भागाला थोडी जळजळ होत असेल तर खोबरेल तेल लावता येईल.
- नारळाच्या तेलामुळे डास चावलेल्या भागावर कोणताही त्रास होत नाही आणि पुरळ कमी होतं.
- डास चावल्यामुळे त्वचा सुजून लाल झाली असेल त्यावर कोरफड लावू शकता. कोरफड गरामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात, त्यामुळे त्वचेला थंडावा मिळेल. त्यामुळे सुजलेल्या त्वचेची सूजही कमी होते.