हार्मोनमध्ये होणाऱ्या बदलामुळे पिंपल्स येतात. मुख्यत: तरुण मुला-मुलींना ही समस्या जाणवते. ही त्वचेवर आलेली सूज आहे. त्यामध्ये सुरुवातीला एक गुलाबी ठिपका दिसतो. त्यानंतर शरीरावर काळे डाग पडतात. काही वेळा यामुळे त्वचेवर खड्डे आणि काळे डाग पडतात. त्याने तुमचा चेहरा आणखी खराब दिसतो.
पिंपल्स घालवण्याचे घरगुती उपाय
कडुनिंबाची पावडर आणि मध एकत्र करून त्याचे मिश्रण चेहरा किंवा ज्या भागावर पिंपल्स आलेत तिथं 15 ते 20 मिनिटे लावावे. ते थंडगार पाण्यानं धुवावे. त्यानंतर लोद्र पावडर आणि गुलाबचंद एकत्र करून त्यांचा लेप पिंपल्स आलेल्या भागावर 15 ते 20 मिनिटं लावावा.
advertisement
Video: मेकअप आर्टिस्ट व्हायचंय? जाणून घ्या खास कोर्स आणि टिप्स
पिंपल्स घालवण्यासाठी कोरफडीचा गरही उपयुक्त आहे. विशेषत: ज्या व्यक्तीच्या पेशंट्सवर बरीच फोडं झाली आहेत त्यांनी कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर रक्तचंदन पावडराचा लेप पाण्यासोबत मिक्स करून चेहऱ्याला त्याचा लेप लावावा, त्यामुळे चेहरा तजेलदार दिसतो, अशी माहिती डॉ. चित्ते यांनी दिली. त्याचबरोबर दूध आणि हळद एकत्र करून त्याचा लेप चेहऱ्याला लावणे हा घरगुती उपाय देखील अनेकांना माहिती असून तो फायदेशीर आहे, असं त्यांनी सांगितलं. घरगुती उपाय करुन आठवडाभरात पिंपल्स कमी होत नसतील तर जवळच्या डॉक्टरांना दाखवावे असा सल्ला चित्ते यांनी दिला.
( सूचना: या बातमीतील संबंधित तज्ज्ञाची वैयक्तिक मतं देण्यात आली आहेत. त्याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)